Indian Super League: आयएसएल फुटबॉल लढतीत गुरुवारी हैदराबाद एफसीविरुद्ध महंमद साजिद धोत याने अचूक हेडिंग साधत चेन्नईयीन एफसीला आघाडी मिळवून दिली तो क्षण. Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: चेन्नईयीनला हैदराबादने बरोबरीत रोखले

चेन्नईयीन एफसीला आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी बरोबरीवर समाधान मानावे लागले होते..

दैनिक गोमन्तक

पणजी: चेन्नईयीन एफसीला आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी बरोबरीवर समाधान मानावे लागले, त्यामुळे गुणतक्त्यात पहिल्या चार संघांत त्यांना स्थान मिळविणे शक्य झाले नाही. दोन वेळच्या माजी विजेत्यांना हैदराबाद एफसीने 1-1 असे रोखले. सामना फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.(Indian Super League: Chennaiyin were held to draw by Hyderabad)

चेन्नईयीन एफसीला (Chennaiyin FC) 13 व्या मिनिटास आघाडी

सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. मोसमातील तिसराच सामना खेळणाऱ्या महंमद साजिद धोत याने शानदार हेडिंगद्वारे चेन्नईयीन एफसीला 13 व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. नंतर 45+3 व्या मिनिटास स्पॅनिश आघाडीपटू हावियर सिव्हेरियो याने हैदराबादला (Haydrabad FC) बरोबरी साधून दिली. प्रत्येकी एक गुण मिळाल्यामुळे दोन्ही संघांना गुणतक्त्यात मोठी प्रगती साधता आली नाही. हैदराबादचा ही 11 सामन्यातील पाचवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 17 गुण झाले असून तिसरा क्रमांक मिळाला आहे. +10 या गोलसरासरीसह त्यांनी समान गुण असलेल्या मुंबई सिटीस (गोलफरक +2) चौथ्या स्थानी ढकलले. चेन्नईयीनची ही तिसरी बरोबरी ठरली. 11 लढतीनंतर 15 गुणांसह ते सहाव्या स्थानी कायम राहिले. समान गुणांत एटीके मोहन बागानने (गोलफरक +2) चेन्नईयीनला (गोलफरक -3) मागे टाकले.

चेन्नईयीनने सेटपिसेवर साधली संधी

आघाडी घेताना चेन्नईयीनने सेटपिसेवर संधी साधली. कर्णधार अनिरुद्ध थापा याच्या अप्रतिम फ्रीकिकवर बचावफळीतील साजिद धोत याने योग्यवेळी हेडिंग साधत प्रतिस्पर्धी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला पूर्णपणे बेसावध ठरविले. आयएसएल स्पर्धेत पाचवा मोसम खेळणाऱ्या 24 वर्षीय खेळाडूचा हा एकंदरीत 26 लढतीतील पहिलाच गोल ठरला. विश्रांतीला चेन्नईयीन संघ आघाडीवर राहणार असे वाटत असताना 24 वर्षीय सिव्हेरियो याने मोसमातील चौथा गोल नोंदवून हैदराबादची पिछाडी भरून काढली. आशिष राय याच्या सुंदर क्रॉस पासवर सिव्हेरियो याने एका झटक्यात हेडिंगद्वारे चेंडूला नेटची दिशा दाखविली. यावेळी गोलरक्षक देबजित मजुमदार चेंडूच्या वेगासमोर हतबल ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT