IND vs SA: केपटाऊनमध्ये ऋषभ पंतचा शतकी जलवा

ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपली ताकद दाखवत ऐतिहासिक शतक झळकावून टीम इंडियाच्या विजयाच्या आशा उंचावल्या.
Rishabh Pant
Rishabh PantDainik Gomantak
Published on
Updated on

केपटाऊन कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पुन्हा फ्लॉप ठरले, परंतु ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपली ताकद दाखवत ऐतिहासिक शतक झळकावून टीम इंडियाच्या (Team India) विजयाच्या आशा उंचावल्या. भारताने दुसऱ्या डावात केवळ 198 धावा केल्या. तर पंत 100 धावांवर नाबाद परतला. पंतशिवाय फक्त कर्णधार विराट कोहलीच (Virat Kohli) संघर्ष करु शकला आणि बराच काळ खेळपट्टीवर टिकून राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa) डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीनेही 3-3 बळी घेतले.

दरम्यान, भारताने आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. तसेच केपटाऊनमध्ये टीम इंडिया कधीही जिंकलेली नाही. अशा स्थितीत भारतीय संघाला इतिहास रचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 211 धावांच्या आधी बाद करावे लागेल. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने सेंच्युरियनमध्ये पहिला कसोटी सामना जिंकला, तर जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने जोरदार पुनरागमन करत भारताला हरवून मालिकेत बरोबरी साधली.

Rishabh Pant
IND Vs SA: ऋषभ पंतने अर्धशतक ठोकत विक्रमांना घातली गवसणी

शिवाय, केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 57 धावसंख्येवरून डावाला पुढे सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा आणि कोहली क्रीजवर होते, परंतु दिवसाच्या दुसऱ्या चेंडूवर पुजारा मार्को यान्सनने बाद केला. कीगन पीटरसनने लेग स्लिपवर एका हाताने पुजाराचा सनसनाटी झेल घेतला. त्यानंतर पुढच्याच षटकात अजिंक्य रहाणेला कागिसो रबाडाच्या हाती स्लिपमध्ये झेलबाद केले. भारताने अवघ्या 58 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत संघाला मोठ्या भागीदारीची गरज होती आणि ती ऋषभ पंत आणि कोहलीने पूर्ण केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com