ATK Mohan Bagan

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: एटीके मोहन बागानसमोर हैदराबादचे आव्हान

इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात अव्वल स्थानासाठी जोरदार चुरस आहे.

किशोर पेटकर

पणजी: इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात अव्वल स्थानासाठी जोरदार चुरस आहे. बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) व हैदराबाद एफसी (Hyderabad FC) यांच्यात होणाऱ्या लढतीतील विजेता संघ निश्चितच गुणतक्त्यात पहिला क्रमांक प्राप्त करेल.

आयएसएल स्पर्धेत सध्या गतविजेता मुंबई सिटी एफसी 16 गुणांसह अग्रस्थानी आहे, पण सोमवारी त्यांना ओडिशा एफसीने पराभवाचा धक्का दिल्यामुळे अव्वल स्थान भक्कम करता आले नाही. त्यामुळे इतर संघांनाही संधी प्राप्त झाली. सलग सात सामने अपराजित असलेल्या हैदराबादचे 15 गुण असून सध्या ते दुसऱ्या स्थानी आहेत. नवे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली लागोपाठ दोन सामने जिंकलेल्या एटीके मोहन बागानचे 14 गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादने स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर चार विजय व तीन बरोबरी अशी दिमाखदार कामगिरी केली आहे. मागील लढतीत त्यांनी ओडिशा एफसीचा 6-1 फरकाने धुव्वा उडविला. हैदराबाद, तसेच एटीके मोहन बागान संघाची शैली आक्रमक असून त्यांनी प्रत्येकी 18 गोल केले आहेत

``स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांची शैली जवळपास समान आहे. माझ्या संघाने मागील दोन आठवड्यांत घेतलेली मेहनत पाहता हैदराबादवर विजय मिळविण्याची क्षमता संघात आहे. सातत्य राखण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,`` असे एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक फेरांडो यांनी सांगितले.

या खेळाडूंवर असेल लक्ष

- हैदराबाद एफसीचा 37 वर्षीय नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोम्यू ओगबेचे याचे 8 सामन्यांत 8 गोल, संयुक्त अग्रस्थानी

- एटीके मोहन बागानचा 23 वर्षीय गोमंतकीय स्ट्रायकर लिस्टन कुलासोचे 8 सामन्यांत 5 गोल, सलग 2 लढतीत सामनावीर, आयएसएलमध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय

- याशिवाय एटीके मोहन बागानचा फ्रेंच खेळाडू ह्युगो बुमूस याचे 5, तर फिजी देशाचा रॉय कृष्णा याचे 4 गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT