Dutee Chand Dainik Gomantak
क्रीडा

Dutee Chand Ban: डोपिंग प्रकरण द्युती चंदच्या अंगलट! कारकिर्दीला लागणार चार वर्षांचा ब्रेक

Dutee Chand Ban: भारताची पदक विजेती धावपटू द्युती चंदवर 4 वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Indian Sprinter Dutee Chand banned for four years by the National Anti-Doping Agency NADA for failing dope tests:

भारताची एशियन गेम्समध्ये दोनदा रौप्य पदक जिंकणारी धावपटू द्युती चंद हिच्यावर डोपिंग प्रकरणात अडकल्याने 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तिच्यावर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीकडून (NADA) ही बंदी घालण्यात आली आहे.

27 वर्षीय द्युतीच्या नावावर 100 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम आहे, पण गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नाडाने घेतलेल्या दोन सँम्पलमध्ये वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीकडून (WADA) प्रतिबंध असलेले पदार्थ आढळले आहेत. त्याचमुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

द्युतीने नाडाच्या कलम 2.1आणि 2.2 चे उल्लंघन केले असून तिला NADA ADR 2021 च्या कलम 10.2.1.1 नुसार 3 जानेवारीपासून 4 वर्षांसाठी खेळात भाग घेण्यात बंदी असणार आहे.

2021 साली राष्ट्रीय विक्रम नोंदवणाऱ्या द्युतीच्या बंदीचा कालावधी 3 जानेवारी 2023 पासून सुरू झाला आहे.

तिचे सँपल्स 5 आणि 26 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आले होते. या दोन्ही सँम्पलमध्ये 'इतर ऍनाबॉलिक एजंट/एसएआरएमएस' असे प्रतिबंधीत पदार्थ सापडले आहेत. दरम्यान त्यानंतरच्या कालावधीत तिने मिळवलेले विक्रम, मेडल्स परत घेण्यात येतील.

दरम्यान, असे समजले आहे की अँटी डोपिंग डिसिप्लिनरी पॅनलनुसार (एडीडीपी) तिने या पदार्थांच्या सेवनाचे स्त्रोत काय होते, याबद्दल संतुष्ट केले आहे. मात्र ती त्या पदार्थांचे सेवन निष्काळजीपणामुळे की चुकून घेतले, याबाबत काहीही सिद्ध करण्यास अपयशी ठरली.

रिपोर्ट्सनुसार तिने अधिकृत डॉक्टरऐवजी तिच्या फिजिओथेरेपिस्टशी सल्लामसलत केल्यानंतर औषध घेतले होते.

दरम्यान तिच्यावरील कारवाईविरुद्ध अपील करण्यासाठी द्युतीकडे 21 दिवसांचा कालावधी असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT