Brian Lara Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: ब्रायन लाराने घेतली Team India च्या खेळाडूंची भेट, गब्बर अन् अय्यरला दिल्या टिप्स

India vs West Indies: एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला.

दैनिक गोमन्तक

India vs West Indies ODI Series Port of Spain Trinidad Brian Lara: एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 308 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 305 धावातच गारद झाला. भारताच्या विजयानंतर ब्रायन लाराने ड्रेसिंग रुममध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची भेट घेतली. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

दरम्यान, टीम इंडियाच्या (Team India) विजयानंतर लाराने भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान शिखर धवन आणि श्रेयस अय्यर खास संवाद साधताना दिसले. युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंगही तिथे उपस्थित होते. बीसीसीआयने (BCCI) याबाबतचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंपूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही लाराची भेट घेतली होती.

विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शिखर धवनने 97 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला शतक पूर्ण करता आले नाही. शुभमन गिलने 64 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 54 धावांची शानदार खेळी खेळली. भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि चहल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT