Team India ला दुहेरी झटका, एजबॅस्टनमधील पराभवानंतर ICC ची मोठी कारवाई

इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीतील पराभवामुळे भारताला आणखी एक धक्का बसला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Ind Vs Eng 5th Test: बर्मिंगहॅम (Edgbaston) मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीतील पराभवामुळे भारताला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय संघ निर्धारित मर्यादेत षटकांचा कोटा पूर्ण करु शकला नाही, त्यामुळे आयसीसीने टीम इंडियावर कारवाई केली आहे. आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी भारतीय संघाला हा दंड ठोठावला आहे. (Ind Vs Eng 5th Test India Docked Two Wtc Points For Slow Overrate At Edgbaston)

2 गुण वजा केले

ICC आचारसंहिता 2.22 नुसार स्लो ओव्हररेटसाठी, मॅच फीच्या 40 टक्के दंड म्हणून आकारला जातो. तसेच, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पोर्ट्स कंडिशनच्या कलम 16.11.2 नुसार, संघाला प्रत्येक ओव्हर-शॉर्टसाठी एक पॉइंटचा दंड दिला जातो. भारताने निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकल्याने, भारताच्या एकूण गुणांमधून दोन WTC गुण वजा करण्यात आले आहेत.

Team India
Team India: भारताचा हा दिग्गज खेळाडू T20 क्रिकेटमधून घेणार निवृत्ती!

कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही

एजबॅस्टन कसोटीसाठी भारतीय संघाचा (Team India) कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) आपली चूक मान्य केली आहे, त्यामुळे आता औपचारिक सुनावणीची गरज नाही. सामन्यादरम्यान मैदानावरील पंच अलीम दार आणि रिचर्ड केटलबरो, तिसरे पंच मारेस इरास्मस आणि चौथे पंच अ‍ॅलेक्स व्हार्फ यांनी भारतीय संघावर ही कारवाई केली.

Team India
Team India Schedule 2022: इंग्लंड ऑस्ट्रेलियातील खडतर स्पर्धा, T20 World Cup धोक्यात

भारताचा 7 विकेट्सनी पराभव झाला

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला. भारताने (India) दुसऱ्या डावात 10 खेळाडूंच्या मोबदल्यात 245 धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 378 धावा केल्या आणि शेवटची कसोटी 7 गडी राखून जिंकली. रुटने 142 धावा केल्या आणि बेअरस्टोने (Johnny Bairstow) 114 धावांची नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळली. या सामन्यातील विजयासह भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. बेअरस्टोला सामनावीर तर जो रुट आणि बुमराहला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com