Hockey India Twitter/19thAGofficial
क्रीडा

Asian Games Hockey: एक, दोन नाही, तब्बल 16 गोल! भारताची उझबेकिस्तान हरवत दणक्यात सुरुवात

India Hockey team: भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत उझबेकिस्तानविरुद्ध तब्बल १६ गोल नोंदवत विजयाने मोहिमेला सुरुवात केली.

Pranali Kodre

Indian Men's Hockey Team massive 16-0 win over Uzbekistan in 19th Asian Games Hangzhou 2022:

चीनमधील होंगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी भारताच्या हॉकी संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने उझबेकिस्तानला तब्बल 16-0 अशा फरकाने पराभूत केले.

भारताकडून 8 खेळाडूंनी गोल नोंदवले. वरुण कुमारने (12', 36', 50', 52') चार गोल केले, तर ललित कुमार उपाध्याय (7', 24', 53') आणि मनदीप सिंग (18', 27', 28') यांनी गोलची हॅट्रिक साधली. सुखजीत सिंगने (37', 42') दोन गोल केले. तसेच अभिषेक (17'), अमित रोहिदास (38'), शमशेर सिंग (43') आणि संजय (57') यांनी प्रत्येकी एक गोल केले.

भारतीय संघाने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरूवात केली होती. त्यांनी उझबेकिस्तानच्या बचावाला स्थिरावण्याची संधी दिली नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये ललितने 7 व्या मिनिटाला भारताच्या गोलचे खाते उघडले. त्यानंतर वरुणने पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल नोंदवला.

त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी चांगला खेळ करत तब्बल 5 गोल नोंदवले. त्यामुळे पहिला हाफ संपला, तेव्हा भारताने 7-0 अशी आघाडी मिळवली होती.

भारतीय संघाने तिसऱ्या क्वार्टरमध्येही आपल्या खेळातील लय कायम ठेवत 5 गोल नोंदवले, तर चौथ्या क्वार्टरमध्ये 4 गोल नोंदवत भारताने हा सामना सहज नावावर केला. या संपूर्ण सामन्यात उझबेकिस्तानला पुनरागमनाची संधीच मिळाली नाही.

आता भारताचा पुढील सामना मंगळवारी (26 सप्टेंबर) सिंगापूरविरुद्ध होणार आहे.

दरम्यान, भारतीय पुरुष हॉकी संघ यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथे सुवर्ण, तर एकूण १६ वे पदक मिळवण्याच्या हेतूने खेळत आहे.

भारतीय संघाने यापूर्वी 1966, 1998 आणि 2014 साली एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994 आणि 2002 साली रौप्य पदक जिंकले होते. त्याचबरोबर 1986, 2010 आणि 2018 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT