Graham Reid Dainik Gomantak
क्रीडा

Hockey World Cup नंतर भारतीय टीमच्या प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' सदस्यांनीही सोडली साथ

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकांनी वर्ल्डकपनंतर राजीनामा दिला आहे. त्यांनी भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

Pranali Kodre

India Hockey Team: भारतात नुकताच हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवण्यात आली होती, ज्याचे विजेतेपद जर्मनीने जिंकले. ही स्पर्धा संपून एकच दिवस झालेला असताना मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

रिड यांनी हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप टिर्की यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांनी हा निर्णय हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ 9 व्या क्रमांकावर राहिल्यानंतर घेतला आहे.

भारतीय संघाला या वर्ल्डकपमध्ये क्रॉसओव्हरच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले होत्या. त्यानंतर भारताने प्लेसमेंट प्लेऑफचे सामने खेळले, ज्यातून भारताला अर्जेंटिनाच्या बरोबरीने 9 वा क्रमांक मिळाला.

रिड यांच्याबरोबर भारतीय हॉकी संघाचे ऍनेलिटिकल प्रशिक्षक ग्रेग क्लार्क आणि शास्त्रीय सल्लागार (Scientific Advisor) मिशेल डेविड पेम्बेर्टन यांनीही सोमवारी सकाळी आपला राजीनामा हॉकी इंडियाकडे सोपवला आहे. हे तिघेही आता पुढील महिन्यापर्यंत नोटीस प्रीरियड पूर्ण करतील.

रिड आणि त्यांची सपोर्ट स्टाफची टीम 2019 पासून भारतीय संघाबरोबर काम करत होती. टोकीयो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय संघाचाही रिड आणि त्यांची सपोर्ट स्टाफची टीम भाग होती. तसेच त्यांनी राष्ट्रकुल 2022 स्पर्धेतही रौप्य पदक विजेत्या भारतीय संघाला मार्गदर्शन दिले होते.

रिड यांचा भारतीय संघाबरोबरचा कालावधी यशस्वी राहिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदकाबरोबरच एफआयएच सिरिज फायनलही जिंकली.

(Indian Men's Hockey Team Chief Coach Graham Reid resigns)

रिड यांनी भारतीय संघाबरोबरील त्यांच्या कार्यकाळाबद्दल म्हणाले की 'माझ्यासाठी आता पायउतार होण्याची आणि पुढील संघव्यवस्थापनाला कारभार सोपवण्याची वेळ आली आहे. या संघाबरोबर आणि हॉकी इंडियाबरोबर काम करणे अभिमानाचे आणि सन्मानाचे होते. या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला. मी संघाला खूप शुभेच्छा देतो.'

याबरोबरच तिन्ही प्रशिक्षकांचे राजीनामे स्विकारताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांनी तिघांचे आभार मानले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑलिम्पिक पदक जिंकल्याबद्दल विशेष कौतुक केले. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की आता पुढील टप्प्यातील प्रवासाची सुरुवात कारायची आहे. त्यामुळे आता संघासाठी नव्या दृष्टीकोनासह पुढे जाण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT