Hockey India hockeyindia
क्रीडा

Hockey Pro League 2023-24: टीम इंडियाकडून विजयासह घरच्या लेगचा शेवट गोड, आयर्लंडचा 4-0 ने दारुण पराभव

India Hockey Team: रविवारी भारतीय संघाने हॉकी प्रो लीग 2023-24 मध्ये आयर्लंडविरुद्ध 4-0 ने दणदणीत विजय मिळवला

Pranali Kodre

Indian Men's Hockey Team beat Ireland 4-0 to finish home leg of FIH Hockey Pro League 2023-24

भारतीय हॉकी संघाने रविवारी एफआयएच प्रो लीग 2023-24 मधील घराच्या लेगचा विजयाने शेवट केला आहे. रविवारी रुरकेलामधील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडला 4-0 अशा फरकाने पराभूत केले. हा भारताचा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. त्यामुळे 15 पाँइंट्ससह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांक मिळवला आहे.

भारताने आत्तापर्यंत एफआयएच प्रो लीगमध्ये 8 सामने खेळले आहेत. यातील तीन सामने जिंकले आहेत, तर चार सामना बरोबरीत सुटले आहेत. तसेच एक सामना पराभूत झाला आहे. भारताने एकमेव सामना जो पराभूत झाला आहे, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भुवनेश्वरला झाला होता.

दरम्यान, रविवारी झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारताकडून निसकांत शर्मा (14'), आकाशदीप सिंग (15') गुरजंत सिंग (38') आणि जुगराज सिंग (60') यांनी प्रत्येकी एक गोल केले. आयर्लंडकडून कोणालाही गोल करण्याची संधी भारताच्या बचावाने दिली नाही.

पहिल्याच क्वार्टरमध्ये आयर्लंडला दोनदा पेनल्टी कॉर्नरवर गोलची संधी होती. परंतु भारताचा गोलकिपर पीआर श्रीजेश आणि बचावाने चांगला खेळ करत गोल होऊ दिला नाही.

या क्वार्टर संपण्यास अखेरची दोन मिनिटे राहिलेली असतानाच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर निलकांताने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्याच्या पुढच्याच मिनिटाला आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल नोंदवला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना या क्वार्टरमध्येही पेनल्टी कॉर्नरवर गोलची संधी मिळाली होती. परंतु, भारतीय बचाव भक्कम राहिला. त्यामुळे पहिल्या हाफनंतर भारतीय संघ 2-0ने आघाडीवर राहिला.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये 38 व्या मिनिटाला रिव्हर्स हिट क्रॉस खेळत गुरजंत सिंगने भारताला तिसरा गोल करून दिला. दरम्यान, 41 व्या मिनिटाला आयर्लंडला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण अमित रोहिदासने गोल होऊ दिला नाही.

अखेरच्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांकडून गोलसाठी प्रयत्न केले, पण 59 व्या मिनिटापर्यंत एकही गोल झाला नव्हता. पण अखेरच्या मिनिटात जुगराज सिंगने भारतासाठी आणखी एक गोल केला. त्यामुळे भारताने 4-0 असा दणदणीत विजय मिळवला.

आता भारतीय संघ हॉक प्रो लीगमध्ये पुढचा सामना बेल्जियम लेगमध्ये खेळणार आहे. पुढील सामना 22 मे 2024 रोजी अर्जेंटिनाविरुद्ध बेल्जियममध्ये होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT