IND vs PAK Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: भारत-पाकिस्तान 30 सप्टेंबरला पुन्हा भिडणार, रोमांचक सामन्यासाठी सज्ज व्हा!

India vs Pakistan, Asian Games-2023: यंदाच्या आशियाई क्रिडा स्पर्धा चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहे.

Manish Jadhav

India vs Pakistan, Asian Games-2023: यंदाच्या आशियाई क्रिडा स्पर्धा चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय हॉकी संघ चीनला रवाना झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना या महिन्यात 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.

भारतीय संघ चीनला रवाना झाला

दरम्यान, 23 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशियाई स्पर्धेत आपली छाप सोडण्याच्या उद्देशाने भारताचा पुरुष हॉकी संघ हँगझोऊला रवाना झाला आहे. भारत 24 सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

भारताला (India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, जपान, बांगलादेश, सिंगापूर आणि उझबेकिस्तानसह पूल अ मध्ये स्थान देण्यात आले आहे.

ब गटात कोरिया, मलेशिया, चीन, ओमान, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. प्रत्येक पूलमधील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

दुसरीकडे, हरमनप्रीत सिंग पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे, तर हार्दिक सिंग उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. संघ रवाना होण्यापूर्वी हरमनप्रीत म्हणाला होता की, 'आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाने खूप मेहनत घेतली आहे.

नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आम्ही चांगली कामगिरी केली. अशीच कामगिरी कायम राखणे हे आमचे ध्येय आहे.

आमच्या गटात आम्ही काही कडव्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करु. आम्हाला आमच्या तयारीवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही या स्पर्धेत शानदार कामगिरी करु...'

30 सप्टेंबरला पाकिस्तानशी सामना

भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक म्हणाला होता की, 'आम्ही स्पर्धेपूर्वी काही सराव सत्रांमध्ये भाग घेतला. सर्वांनी एक ध्येय समोर ठेवून तयारी केली. आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर आहोत.

अलिकडच्या काही महिन्यांतील आमची चांगली कामगिरी कायम राखणे आणि चीनमध्ये पदक पटकावणे हे आमचे ध्येय आहे.'' उझबेकिस्तानशी सलामीच्या लढतीनंतर भारताचा सामना 26 सप्टेंबरला सिंगापूर, 28 सप्टेंबरला जपान आणि 30 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) होईल. भारतीय संघ ग्रुप राऊंडमधील शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध 2 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे.

भारतीय संघ

संघात गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि कृष्णा पाठक यांचा समावेश आहे. वरुण कुमार, अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग आणि संजय बचाव पक्षाची जबाबदारी सांभाळतील.

मधल्या रांगेत नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, सुमित आणि समशेर सिंग यांचा समावेश आहे तर पुढच्या रांगेत अभिषेक, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, सुखजित सिंग आणि ललित कुमार उपाध्याय यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT