MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: जेव्हा धोनी गातो 'सलाम-ए-इश्क मेरी जान' गाणं, Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

MS Dhoni Video: धोनी 'सलाम-ए-इश्क मेरी जान' गाणं गातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Pranali Kodre

MS Dhoni singing Salaam-e-Ishq meri Jaan’ song: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने नुकताच शुक्रवारी (7 जुलै) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला केवळ भारतातूनच नाही, जगभरातून शुभेच्छा देण्यात आल्या.

याचदरम्यान धोनीचा माजी संघसहकाऱ्याने त्याचा एक खास व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

धोनीच्या वाढदिवशी वेगवान गोलंदाज मोहित शर्माने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात धोनी 'सलाम-ए-इश्क मेरी जान'हे गाणे गाताना दिसत आहे. तसेच धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या सरावाच्या जर्सीमध्ये असल्याचे दिसत आहे. याहा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मोहित धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून तसेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला आहे. सध्या मोहित भारतीय संघातून बाहेर असला, तरी आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्स संघाकडून खेळतो.

मोहितने आयपीएल 2023 मध्येही प्रभावित करणारी गोलंदाजी केली होती. तो या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता. त्याने 14 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या.

लोकप्रिय क्रिकेटपटू

धोनी हा केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली, तरी त्याच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही.

धोनी भारताचा यशस्वी कर्णधारही असून त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.

धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अद्यापही आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT