Mohammed Siraj Birthday Special Video
Mohammed Siraj Birthday Special Video X/BCCI
क्रीडा

Siraj Birthday: '...तेव्हा हात भाजायचे, तो खूप संवेदनशील विषय', सिराजने ऐकवला BCCI च्या व्हिडिओतून संघर्षमय प्रवास

Pranali Kodre

Mohammed Siraj Shares His Story with BCCI

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा 13 मार्च रोजी वाढदिवस असतो. तो बुधावारी त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 मार्च 1994 रोजी सिराजचा जन्म हैदराबदला झाला होता.

त्याने आत्तापर्यंत भारताकडून 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 130 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अनेकदा त्याच्या गोलंदाजीने भारताला मोठे विजय देखील मिळवून दिले आहेत.

दरम्यान, त्याच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सिराजने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितले आहे, तसेच हैदराबादमधून तो कसा पुढे आला, त्याचा प्रवास कसा होता आणि त्याच्यासाठी काही खास असणाऱ्या ठिकाणांबद्दलही त्याने या व्हिडिओमध्ये भाष्य केले आहे.

सिराजने या व्हिडिओमध्ये सांगितले की त्याने 2019-2020 मध्ये ठरवले होते की तो हे अखेरचे वर्ष क्रिकेटसाठ देत आहे, त्यानंतर पुढे खेळायचे की नाही, याचा निर्णय घेईल. परंतु, नंतर त्याने क्रिकेट सुरू ठेवले.

सिराज हैदराबादमधील त्याच्या नेहमीच्या चहा पिण्याच्या ठिकाणही दाखवतो, तसेच तो कुठे क्रिकेट खेळायचा ते ठिकाणही दाखवतो. त्याबरोबर एका रस्त्याने जात असताना तो लहनपणीची आठवण सांगतो की इथे पूर्वी कसे डोंगर होते.

तसेच तो असेही सांगतो की गाडी चालवताना त्याला सॅड साँग ऐकायला आवडतात. त्याने सांगितले की जेव्हा पण तो हैदराबादला येतो, तेव्हा पहिल्यांदा घरी जायचं आणि मग ईगगाह जायचा विचार तो करतो. तो म्हणाला, त्याला जगात कुठेही गेला, तरी इकडे आल्यानंतर मिळणारे समाधान कुठेही मिळत नाही.

त्याने सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातील एक आठवणही सांगितली. तो म्हणाला, 'मी जेव्हा १८ वर्षांचा होतो, तेव्हा मी कॅटरिंग सेक्टरमध्ये काम करायचो. घरचे म्हणायचे शिक, पण मला क्रिकेटच खेळायला आवडायचे.'

सिराज पुढे म्हणाला, 'आम्ही भाड्याने राहायचो. वडील कमावणारे एकटे होते. भाडेही द्यावे लागायचे. 100-200 रुपये मिळाले, तर मी खूश व्हायचो. घरी 150 रुपये दिले, तर 50 रुपये मला मिळायचे. हा खूप संवेदनशील विषय आहे.'

'माझे हात भाजायचे. रुमाली रोटी जी असते, त्याला पलटायचेही असते. तर ते करताना हात कधीकधी भाजायचे. असाच मोठा नाही झालो, संघर्ष करून मोठा झालो. आमच्याकडे वडिलांची रिक्षा होती आणि प्लॅटिना मोटरसायकल होती. तिलापण धक्का देऊन चालू करायला लागायचं.'

तसेच सिराजने तो जिथे क्रिकेट खेळायला शिकला ती जागाही दाखवली. त्याने असेही सांगितले की टेनिस बॉलने तो क्रिकेट खेळायचा. तिथे त्याचे मित्रमंडळीही उपस्थित होते.

या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. दरम्यान, सिराज नुकताच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता. आता तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT