Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

Jasprit Bumrah: बुमराह 'त्या' खेळाडूच्या निवृत्तीनं इमोशनल! म्हणाला, 'कधीही हार न मानण्याची...'

टीम इंडियातून सध्या बाहेर असलेल्या बुमराहने नुकतीच एका स्टार खेळाडूच्या निवृत्तीबद्दल केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Pranali Kodre

Jasprit Bumrah emotional post: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. पण असे असले तरी सध्या त्याची एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

जसप्रीत बुमराहने स्वीडनचा आणि एसी मिलानचा स्टार फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविकच्या निवृत्तीबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या निवृत्तीबद्दल त्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या असून त्याची याच पोस्टची सध्या चर्चा आहे.

झ्लाटन इब्राहिमोविकने रविवारी (4 जून) निवृत्तीची घोषणा केली. चालू हंगामानंतर झ्लाटनचा एसी मिलानबरोबरचा करार संपणार होता. त्यामुळे 41 वर्षीय झ्लाटनने आपल्या प्रोफेशनल फुटबॉल कारकिर्दीचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर बुमराहने झ्लाटनचे फोटो शेअर करताना लिहिले की 'माझ्यासाठी तू नेहमीच प्रेरणास्त्रोत राहण्यासाठी आणि कधीही हार न मानण्याची सिंहाच्या हृदयासारखी वृत्ती शोधण्यासाठी मला मदत केल्याबद्दल तुझा आभारी आहे. तू तुझ्या कारकिर्दीत अनेक शानदार आठवणी तयार केल्या आहेत, त्या अविस्मरणीय असतील.'

बुमराहने यापूर्वीही अनेकदा सांगितले होते की झ्लाटन त्याचा आवडता खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीने आता बुमराहला वाईट वाटले आहे. झ्लाटनने 24 वर्षांच्या कारकिर्दीत 561 गोल केले आहेत.

बुमराह भारतीय संघातून बाहेर

बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत होता. त्याचमुळे साधारण दोन महिन्यांपूर्वी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो आयपीएल २०२३ स्पर्धेलाही मुकला, त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याला खेळला आलेले नाही.

खरंतर बुमराहला गेल्या 9 महिन्यात भारताकडून क्रिकेट खेळताच आलेले नाही. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता. दरम्यान सध्या तो शस्त्रक्रियेनंतर सावरत असून आता आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये पुनरागमन करू शकतो.

बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

जसप्रीत बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत कसोटीत 30 सामन्यांत 128 विकेट्स घेतल्या. तसेच 72 वनडे सामन्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 70 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 38 व्या वर्षी क्रिकेटपटूचं निधन; राशिद खान ढसाढसा रडला राशिद खान; अंत्ययात्रेतील व्हिडिओ भावुक करणारा

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची खिलाडू वृत्ती

Goa Digital Library: राज्यात केवळ 2.9 टक्‍के शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी; 33 टक्‍के शाळांमध्येच 'स्मार्ट क्लासरूम', केंद्र सरकारचा अहवाल

Goa crime: तुये खुनीहल्ला प्रकरण; तिळारी परिसरात नेऊन नर्सला मारण्‍याचा होता डाव? संशयित गौतमला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Ponda Water Supply Issue: पाण्‍याची समस्‍या आठ दिवसांत सोडवा, अन्‍यथा त्रासात पडाल! मुख्‍यमंत्र्यांचा फोंड्यात अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT