Test Series Dainik Gomantak
क्रीडा

केपटाऊनमध्ये 'जलवा' दाखवणारे भारतीय गोलंदाज माहितीये?

कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ केपटाऊनचा किल्ला जिंकण्याच्या तयारीत आहे.

दैनिक गोमन्तक

कसोटी मालिका (Test Series) जिंकण्यासाठी भारतीय संघ केपटाऊनचा किल्ला जिंकण्याच्या तयारीत आहे. या तयारीमध्ये गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरते, ज्यांच्यावर 20 विकेट्स घेण्याची जबाबदारी असते. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या 5 कसोटी सामन्यांमध्ये कोणत्या भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि ज्यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या, त्यावर एक नजर टाकूया.

केपटाऊनच्या खेळपट्टीवर भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथच्या नावावर आहे. त्याने कसोटी सामन्यात 24 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 12 बळी घेतले आहेत.( IND vs SA Test Series Latest news updates)

अनिल कुंबळेने केपटाऊनमध्ये 3 सामन्यात 46 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 11 विकेट घेतल्या आहेत आणि श्रीनाथनंतर दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांमध्ये झहीर खानने 32 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 9 विकेट घेतल्या आहेत. न्यूलँड्समध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आणि केपटाऊनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत त्याचे स्थान चौथ्या क्रमांकावर आहे. तिथे खेळलेल्या एकमेव कसोटीत त्याने 27 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 7 बळी घेतले.

श्रीशांतने केपटाऊनमध्ये 2 कसोटी सामने खेळले आणि 43 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या. तेथे सर्वाधिक विकेट घेणारा तो ५वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) टीम इंडियाच्या कसोटी संघाचा भाग नाही. पण केपटाऊनच्या 12 विकेटही त्याच्या नावावर आहेत. त्याने येथे एकमेव कसोटी खेळली आहे आणि 20 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 6 बळी घेतले आहेत.

सध्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर टीम इंडियात समाविष्ट असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) केपटाऊनमधूनच कसोटी पदार्पण केले. 2018 दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत त्याने 28 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 4 बळी घेतले. न्यूलँड्स येथे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये तो 7व्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT