Harmilan Bains, Jyothi Yarraji, Tajinderpal Singh Toor  X/Media_SAI
क्रीडा

Asian Indoor Athletics: भारतासाठी सोनियाचा दिनु! ज्योती, तेजिंदरपालला राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण; हरमिलननेही केलं टॉप

Pranali Kodre

Indian athletes Tajinderpal Singh Toor Jyothi Yarraji Harmilan won gold medals at Asian Indoor Athletics Championships 2024:

शुक्रवारपासून इराणमध्ये आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2024 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण 15 भारतीय खेळाडू सामील झाले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी भारताच्या तीन खेळाडूंनी फक्त पदकेच जिंकली नाही, तर सुवर्णमय कामगिरी नोंदवली.

हरमिलन बैन्स, ज्योती याराजी आणि तेजिंदरपाल सिंग तूर यांनी या स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत.

लांब पल्ल्याच्या शर्यतीतील भारताची स्टार धावपटू हरमिलन बैन्सने शनिवारी भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. तिने 1500 मीटर महिलांच्या शर्यतीत 4:29.55 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

तिने या शर्यतीत रौप्य पदक जिंकलेल्या किर्गिझस्तानच्या कलील किझी ऐनुस्कापेक्षा (4:35.29) पाच सेकंद कमी वेळ नोंदवली. या शर्यतीत तिसरा क्रमांक कझाकस्तानच्या बोलातबेक्की आयनाने पटकावर कांस्य पदक जिंकले. तिने 4:37.20 सेकंद इतकी वेळ नोंदवली.'

ज्योती याराजीने मोडला स्वत:चाच विक्रम

भारताची अडथळा शर्यतीतील उदयोन्मुख खेळाडू ज्योती याराजीनेही या स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. तिने महिलांच्या 60 मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरीत 8.12 सेकंदाचा वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. ही तिची या प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच हा नवा राष्ट्रीय विक्रमही ठरला.

24 वर्षीय ज्योतीने गेल्यावर्षी याच स्पर्धेत 8.13 सेकंदाची वेळ नोंदवला होता. पण यंदा तिने तिचाच हा विक्रम मोडला आहे. तिन अंतिम सामन्यात विक्रमी वेळ नोंदवण्यापूर्वी तिच्या हिटमध्ये 8.22 सेंकदाचा वेळ नोंदवला होता आणि अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरली होती.

दरम्यान, या शर्यतीत जपानच्या असुका तेरेदाने 8.21 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले, तर हाँग काँगच्या लुई लाई यिऊने 8.26 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. गेल्यावर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटर अडथळा शर्यतीत ज्योतीने रौप्य पदक जिंकले होते.

तेजिंदरपाल सिंगने मोडला 19 वर्षांपूर्वीचा विक्रम

गेल्यावर्षी याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या तेजिंदरपाल सिंग तूरने यंदा देखील सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यंदा त्याने नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने गोळाफेकीमध्ये हे पदक जिंकले.

त्याने शनिवारी 19.72 मीटर लांब गोळा फेकला. हे अंतर त्याला सुवर्णपदक जिंकून देणारे ठरले. त्याने यावेळी केलेल्या दोन्ही थ्रोमध्ये 19 मीटरचे अंतर कापले होते.

दरम्यान, 19 वर्षांपूर्वी 2005 मध्ये विकास गौडाने 19.60 मीटर लांब गोळ फेकत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. पण आता हा विक्रम तेजिंदरपाल सिंगने मोडला आहे.

शनिवारी कझाकस्तानच्या इवानोव इवानने (19.08 मीटर) रौप्य पदक आणि इराणच्या मेहदी साबेरीने (18.74) कांस्य पदक जिंकले. या प्रकारात भारताच्या धनवीरला पदक जिंकण्यात अपयश आले. त्याने त्याचा 18.59 मीटर लांब गोळा फेकला होता.

दरम्यान, भारताकडून अजय कुमार सारोज 1500 मीटर शर्यतीत अंतिम फरीत 3:52.56 वेळ नोंदवत सहाव्या क्रमांकावर राहिला, तर तेजस शिर्शे 60 मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरीत 7.80 सेकंदाची वेळ नोंदवत पाचव्या क्रमांकावर राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT