Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: जस्सीच्या ताबडतोब 9 विकेट्स! रोहितसेनेने जिंकली दुसरी कसोटी; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला.

Manish Jadhav

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. यजमान भारतीय संघाने हा सामना जिंकून इंग्लंडसोबत मालिकेत बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. अशा स्थितीत मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला.

अँडरसनने दिले होते खुले आव्हान!

भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. बुमराहने या सामन्यात एकूण नऊ विकेट घेतल्या. या विजयासह भारताने बेजबॉलचा घमंड मोडला. खरे तर, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला होता की, त्यांचा संघ केवळ 60-70 षटकांत 399 धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करेल, परंतु 300 धावा देखील करु शकला नाही. इंग्लंडकडून फक्त जॅक क्रॉलीला 50 धावांचा टप्पा ओलांडता आला.

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची पहिली विकेट खेळाच्या तिसऱ्या दिवशी पडली, जेव्हा बेन डकेट फिरकी गोलंदाज आर. अश्विनच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर चौथ्या दिवशी बाद होणारा पहिला फलंदाज नाईटवॉचमन रेहान अहमद होता. अक्षर पटेलने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि वैयक्तिक 23 धावा करुन बाद झाला. यानंतर अश्विनने ऑली पोप आणि जो रुटला बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर आणले. जो रुट अतिशय आक्रमक फटके खेळत बाद झाला. अश्विनने ऑली पोपला बाद करुन मोठा विक्रम केला. अश्विन इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने 95 बळी घेणाऱ्या भागवत चंद्रशेखरला मागे टाकले.

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स

रविचंद्रन अश्विन: 21 सामने, 97 विकेट्स

बीएस चंद्रशेखर: 23 सामने, 95 विकेट्स

अनिल कुंबळे : 19 सामने, 92 विकेट्स

बिशनसिंग बेदी: 22 सामने, 85 विकेट्स

कपिल देव: 27 सामने, 85 विकेट्स

त्यानंतर कुलदीपने एलबीडब्ल्यू केलेल्या जॅक क्रॉलीच्या रुपाने भारताला सर्वात मोठे यश मिळाले. क्रॉलीने आक्रमक फलंदाजी करताना अर्धशतकी खेळीही खेळली. लंचपूर्वी जसप्रीत बुमराहने जॉन बेअरस्टोला आपला शिकार बनवले. लंचनंतर बेन स्टोक्स श्रेयसच्या थ्रोवर आऊट झाला. 220 धावांवर सात विकेट पडल्यानंतर बेन फॉक्स आणि टॉम हार्टले यांनी इंग्लंडला सामन्यात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून 55 धावांची भागीदारी केली. मात्र, जसप्रीत बुमराहने फॉक्सला बाद करुन ही भागीदारी मोडली.

इंग्लंडचे दुसऱ्या डावाचे स्कोअर कार्ड

बेन डकेट 28 धावा, विकेट अश्विन 1-50

रेहान अहमद 23 धावा, विकेट, अक्षर पटेल 2-95

ऑली पोप 23 धावा, विकेट, अश्विन 3-132

जो रुट 16 धावा, विकेट, अश्विन 4-154

जॅक क्रॉली 73 धावा, विकेट, कुलदीप यादव 5-194

जॉनी बेअरस्टो 26 धावा, विकेट, जसप्रीत बुमराह 6-194

बेन स्टोक्स 11 धावा, धावबाद 7-220

बेन फोक्स 36 धावा, विकेट, जसप्रीत बुमराह 8-275

शोएब बशीर 0 धावा, विकेट, मुकेश कुमार 9-281

टॉम हार्टले 36 धावा, विकेट, जसप्रीत बुमराह 10-292

दुसरीकडे, यशस्वी जयस्वालच्या शानदार द्विशतकामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव केवळ 253 धावांवरच आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 143 धावांची आघाडी होती. यानंतर भारतीय संघाचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला.

गिल शतक झळकावून फॉर्ममध्ये परतला

भारतीय संघाला दुसऱ्या डावात फारशी सुरुवात करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या धावसंख्येमध्ये एकही धाव जोडता आली नाही. त्यानंतर पहिल्या डावात द्विशतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालची विकेटही भारताने गमावली. रोहित आणि यशस्वी यांना अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने बाद केले. 30 धावांत दोन विकेट पडल्यानंतर गिल आणि श्रेयस अय्यर यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली. दोन्ही खेळाडूंनी मिळून 81 धावांची भागीदारी केली.

मात्र, श्रेयसला रेहान अहमदने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस बाद झाला, पण गिलचे इरादे स्पष्ट झाले आणि त्याने शानदार शतक झळकावून भारताची स्थिती मजबूत केली. गिलने 147 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 104 धावा केल्या. गिलला अक्षर पटेलने (45 धावा) ही पूर्ण साथ दिली.

अक्षर-गिल जोडीने पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. गिलला शोएब बशीरने बाद केले. गिल बाद झाल्यानंतर बाकीचे फलंदाज विशेष काही करु शकले नाहीत. भारताने शेवटच्या पाच विकेट 45 धावांत गमावल्या. त्यामुळे भारताचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून टॉम हार्टलीने सर्वाधिक चार आणि रेहान अहमदने तीन विकेट घेतल्या. याशिवाय, जेम्स अँडरसनला दोन, तर शोएब बशीरला एक विकेट मिळाली.

भारताच्या दुसऱ्या डावाचे स्कोअर कार्ड

रोहित शर्मा 13 धावा, विकेट, जेम्स अँडरसन 1-29

यशस्वी जयस्वाल 17 धावा, विकेट, जेम्स अँडरसन 2-30

श्रेयस अय्यर 29 धावा, विकेट, टॉम हार्टले 3-111

रजत पाटीदार 9 धावा, विकेट, रेहान अहमद 4-122

शुभमन गिल 104 धावा, विकेट, शोएब बशीर 5-211

अक्षर पटेल 45 धावा, विकेट, टॉम हार्टले 6-220

केएस भारत 6 धावा, विकेट, रेहान अहमद 7-228

कुलदीप यादव 0 धावा, विकेट, टॉम हार्टले 8-229

जसप्रीत बुमराह 0 धावा, विकेट, टॉम हार्टले 9-255

रविचंद्रन अश्विन 29 धावा, विकेट, रेहान अहमद 10-255

बुमराहने पहिल्या डावात कहर केला

पहिल्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. एकवेळी, त्यांची धावसंख्या एका विकेटच्या नुकसानावर 113 धावा होती आणि जॅक क्रोली तुफानी फलंदाजी करत होता. इंग्लिश संघही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते, पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे इरादे वेगळेच होते. बुमराहने असा कहर केला की, इंग्लिश फलंदाज बघतच राहिले. कुलदीप यादवने बुमराहला चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून इंग्लिश खेळाडूंना सतत हादरे दिले.

त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला. जॅक क्रॉलीने 78 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 76 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने तीन यश मिळवले. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात बिनबाद 28 धावा केल्या.

इंग्लंडचे पहिल्या डावाचे स्कोअर कार्ड

रोहित शर्मा 13 धावा, विकेट, जेम्स अँडरसन 1-29

यशस्वी जयस्वाल 17 धावा, विकेट, जेम्स अँडरसन 2-30

श्रेयस अय्यर 29 धावा, विकेट, टॉम हार्टले 3-111

रजत पाटीदार 9 धावा, विकेट, रेहान अहमद 4-122

शुभमन गिल 104 धावा, विकेट, शोएब बशीर 5-211

अक्षर पटेल 45 धावा, विकेट, टॉम हार्टले 6-220

केएस भारत 6 धावा, विकेट, रेहान अहमद 7-228

कुलदीप यादव 0 धावा, विकेट, टॉम हार्टले 8-229

जसप्रीत बुमराह 0 धावा, विकेट, टॉम हार्टले 9-255

रविचंद्रन अश्विन 29 धावा, विकेट, रेहान अहमद 10-255

भारताचे पहिल्या डावाचे स्कोअर कार्ड

रोहित शर्मा 14 धावा, विकेट, शोएब बशीर 1-40

शुभमन गिल 34 धावा, विकेट, जेम्स अँडरसन 2-89

श्रेयस अय्यर 27 धावा, विकेट, टॉम हार्टले 3-179

रजत पाटीदार 32 धाव, विकेट, रेहान अहमद 4-249

अक्षर पटेल 27 धावा, विकेट, शोएब बशीर 5-301

केएस भारत 17 धावा, विकेट, रेहान अहमद 6-330

आर अश्विन 20 धावा, विकेट, जेम्स अँडरसन 7-367

यशस्वी जयस्वाल 209 धावा, विकेट, जेम्स अँडरसन 8-383

जसप्रीत बुमराह 6 धावा, विकेट, रेहान अहमद 9-395

मुकेश कुमार 0 धावा, विकेट, शोएब बशीर 10-396

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT