Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारी ते 11 मार्च 2024 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.
या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमला सुरू होणार आहे.
मात्र, या सामन्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार रविंद्र जडेजाला पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.
तसेच केएल राहुलने त्याच्या उजव्या मांडीमध्ये वेदना होत असल्याची तक्रार केली आहे.
त्यामुळे सध्या जडेजा आणि केएल राहुल यांच्यावर बीसीसीआयचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवून आहे.
जडेजा बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येही त्याच्या दुखापतीवरील उपचारासाठी दाखल झाला आहे.
जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाल्यानंतर बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि सर्फराज खान यांना संघात सामील केले आहे.