IND vs ENG: रोहितने जिंकला टॉस! पाटीदार-बाशीरचे झाले पदार्पण, असे आहेत भारत-इंग्लंडचे 'प्लेइंग-11'

India vs England: दुसऱ्या कसोटीतून भारताकडून पाटीदारचे आणि इंग्लंडकडून बाशीरचे पदार्पण झाले आहे.
India vs England
India vs EnglandPTI
Published on
Updated on

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. विशाखापट्टणममधील डॉ. वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-वीडिसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून रजत पाटिदारचे आणि इंग्लंडकडून शोएब बाशीरचे पदार्पण झाले आहे.

या सामन्यापूर्वी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांना काही खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करावा लागला आहे. भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि फलंदाज केएल राहुल हे दोघेही दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर झाले आहेत.

त्याचमुळे केएल राहुलच्या जागेवर पाटीदारला संधी देण्यात आली आहे. तसेच जडेजाच्या जागेवर चायनामन कुलदीप यादवचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. याशिवाय भारताने मोहम्मद सिराजला या सामन्यासाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे त्याच्याजागेवर मुकेश कुमारला दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

तसेच इंग्लंडचा प्रमुख फिरकीपटू जॅक लीच दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याचमुळे त्याच्या जागेवर 20 वर्षीय बाशीरला संधी देण्यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या जागेवर 41 वर्षीय जेम्स अँडरसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

India vs England
IND vs ENG: टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी, रवींद्र जडेजाचे पुनरागमन अवघड! विराट कोहलबाबतही सस्पेन्स

इंग्लंडकडे आघाडी

दरम्यान, सध्या या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हैदराबादला झालेला पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता, त्यामुळे त्यांच्याकडे 1-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे भारताला दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.

तसेच इंग्लंड विजय मिळवून आघाडी आणखी वाढण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याचबरोबर जर हा सामना अनिर्णित राहिला, तरी इंग्लंडकडे 1-0 अशी आघाडी कायम राहिल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भारत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव.

  • इंग्लंड - झॅक क्रॉवली, बेन डकेट,ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हर्टली, शोएब बाशीर, जेम्स अँडरसन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com