Indian Women's Hockey Team X/TheHockeyIndia
क्रीडा

Women's Hockey Asian Champions Trophy: भारतीय संघाचे सुवर्णयश! फायलनमध्ये जपान पराभूत; मोठ्या बक्षीसाची घोषणा

India Women's Hockey Team: भारतीय महिला हॉकी संघाने झारखंड महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

Pranali Kodre

India won Jharkhand Women's Asian Champions Trophy Ranchi 2023:

भारतात एकीकडे वनडे वर्ल्डकप सुरू असतानात रविवारी (5 नोव्हेंबर) भारतीय महिला हॉकी संघानेही शानदार कामगिरी केली. भारतीय महिला हॉकी संघाने झारखंड महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

भारतीय महिला हॉकी संघाने रांचीमधील मरंग गोमके जयपाल सिंग ऍस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानला 4-0 अशा फरकाने पराभूत केले. भारताच्या या विजयानंतर हॉकी इंडियाने संघासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीसाचीही घोषणा केली आहे.

अंतिम सामन्यात भारताकडून संगिता कुमारी (17'), नहा (46'), लालरेमसियामी (57') आणि वंदना कटारिया (60') यांनी गोल केले.

या सामन्यात पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताने चांगली सुरुवात केली होती. दिपीकाने सुरुवातीलाच गोल करण्याचा प्रयत्नही केला होता, पण जपानची गोलकिपर ऐका नाकामुरा हिने हा प्रयत्न अपयशी ठरवला. भारताने सातत्याने आक्रमण केले. पण जपाननेही चांगला बचाव केला होता. त्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच संगिता कुमारीने 17 व्या मिनिटाला गोल करत भारताला खाते उघडून दिले. पण नंतर जपाननेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. जपानला तीन सलग पेनल्टी कॉर्नरही मिळाले होते, पण भारताने चांगला बचाव केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकच गोल झाला. त्यामुळे पहिला हाफ संपला तेव्हा भारत 1-0 अशा फरकाने पुढे होता. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भा

तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताच्या आक्रमणासमोर जपानने दमदार बॉबचाव केला. त्यामुळे भारताला जपानचा बचाव भेदने कठीण जात होते. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताला गोल करता आला नाही.

चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने आपला खेळ उंचावला. भारताला तीन सलग पेनल्टी कॉर्नरही मिळाले, त्यातील तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर 46 व्या मिनिटाला नेहाने भारतासाठी दुसरा गोल नोंदवला.

शेवटची आठ मिनिटे राहिलेले असताना जपानला पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता, पण भारताची कर्णधार सविताना चांगला बचाव केला. अखेरची काही मिनिटे शिल्लक असतानाच लालरेमसियामीने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, तर अखेरच्या मिनिटाला वंदनाने मैदानी गोल करत भारताची आघाडी 4-0 अशी वाढवली. त्यामुळे भारताने हा सामना जिंकत विजेतेपदही जिंकले.

हॉकी इंडियाकडून बक्षीस

हॉकी इंडियाने विजेतेपद जिंकलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंसाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्यांसाठी 1.50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT