Team India X/BCCI
क्रीडा

World Cup 2023: भारत सातव्या विजयासह सेमीफायनलमध्ये! श्रीलंकेला तब्बल 302 धावांनी पाजलं पराभवचं पाणी

India vs Sri Lanka: भारताने श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश पक्का केला.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 302 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग सातवा विजय ठरला. याबरोबरच भारताने 14 गुणांसह उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले.

या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला. दरम्यान, हा श्रीलंकेचा ७ सामन्यांमधील पाचवा पराभव आहे, त्यामुळे अद्याप त्याचे आव्हान अधिकृतरित्या संपले नसले, तरी त्यांच्यासाठी पुढील मार्ग कठीण झाला आहे.

या सामन्यात 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर पाथम निसंकाला डावाच्या पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने पायचीत केले. त्यानंतर दुसऱ्याच षटकात दिमुथ करुणारत्ने आणि सदिरा समरविक्रमा या दोघांनाही शुन्यावर बाद करत मोहम्मद सिराजने श्रीलंकेला दुहेरी धक्के दिले.

चौथ्या षटकात सिराजने श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडीसला 1 धावेवर बाद केले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 4 बाद 3 धावा अशी झाली होती. पण त्यानंतर चरिथ असलंका आणि अँजेलो मॅथ्युजने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण १० व्या षटकात असलंकाला तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीने रविंद्र जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. असलंका 24 चेंडू खेळून एकच धाव करून बाद झाला.

त्याच्या पुढच्यात चेंडूवर शमीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दुशन हेमंथाला माघारी धाडले. १२ व्या षटकात त्याने दुश्मंथा चमीरालाही शुन्यावर बाद केले. तसेच एक बाजू सांभाळत असलेल्या अँजेलो मॅथ्यूजचा अडथळा शमीने 14 व्या षटकात त्याला त्रिफळीचीत करत दूर केला.

यानंतर महिश तिक्षणा आणि कसून रजिताने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न शमीनेच संपवला. त्याने रजिताला 14 धावांवर बाद केले. यासह त्याने 5 विकेट्सही पूर्ण केल्या. श्रीलंकेची अखेरची विकेट 20 व्या षटकात रविंद्र जडेजाने घेतली. त्याने दिलशान मदुशंकाला 5 धावांवर बाद केले. श्रीलंकेकडून महिश तिक्षणा १२ धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पुर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण, भारताचीही सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मदुशंकाने दुसऱ्याच चेंडूवर भारतीय कर्णधार रोहित शर्माची 4 धावांवर विकेट घेतली. मात्र, त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावताना 189 धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली.

मात्र, हे दोघेही शतकाच्या जवळ असताना बाद झाले. या दोघांनाही मदुशंकानेच बाद केले. गिलने 92 चेंडूत 92 धावा केल्या, तर विराटने 94 चेंडूत 88 धावांची खेळी केली. त्यानंतर केएल राहुल श्रेयस अय्यरने 60 धावांची भागीदारी करत डाव पुढे नेला.

मात्र, केएल राहुल २१ धावा करून बाद झाला, तर सूर्यकुमार यादवही १२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रविंद्र जडेजाने श्रेयस अय्यरला चांगली साथ दिली. श्रेयसने आक्रमक खेळत अर्धशतक केले. मात्र, तो 56 चेंडूत 82 धावांची खेळी करून माघारी परतला.

अखेरच्या षटकात मोहम्मद शमी २ धावांवर तिसऱ्या चेंडूवर आणि रविंद्र जडेजा 35 धावांवर शेवटच्या चेंडूवर धावबाद झाले. त्यामुळे भारताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या.

श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर दुश्मंता चमीराने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT