India Women vs Ireland Women: भारताने दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सोमवारी पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा पराभव केला.
दरम्यान, नाणेफेक जिंकून भारताची सुरुवात चांगली झाली. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी लॉरा डेलानीने 10व्या षटकात शफालीला बाद करुन मोडली. शफालीने 29 चेंडूंत 3 चौकारांसह 27 धावा केल्या.
दुसरीकडे, हरनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि रिचा घोष 16व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतल्या. दोघीही डेलानीच्या जाळ्यात अडकल्या. हरनप्रीतने 20 चेंडूत 13 धावांचे योगदान दिले. मात्र, रिचा खातेही उघडू शकली नाही. याच षटकात मानधना आणि दीप्ती शर्मा (0)ही बाद झाल्या. डेलानीने त्यांना आपला बळी बनवले.
त्याचवेळी, 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्ज यष्टीचीत झाली. तिला आर्लेन केलीने बाद केले. जेमिमाने 12 चेंडूत 19 धावा केल्या. तिने 3 चौकार मारले. तर पूजा वस्त्राकरने नाबाद 2 धावा केल्या.
तसेच, भारत (India) आणि आयर्लंड यांच्यातील हा चौथा आणि शेवटचा सामना होता. भारताने मागील तीन सामन्यांपैकी 2 जिंकले, तर एक गमावला. याआधी इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव केला. भारताचे सध्या चार गुण आहेत.
विशेष म्हणजे, भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यातच भारताने आज आयर्लंडला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी इंग्लंड ब गटातून आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.