Indian women's Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Indian Women's Team: कांगारुंना आस्मान दाखवण्यासाठी इंडियन वुमन्स टीम सज्ज, पाहा संपूर्ण संघ

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Indian Women's Team: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ या महिन्यात भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांची टी20 मालिका होणार असून या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेत भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळेल, तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. तसेच पुजा वस्त्राकरला दुखापतीमुळे या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. तसेच स्नेह राणाचाही संघात समावेश नाही. मात्र, तिच्या अनुपस्थितीचे कारण बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

याशिवाय हरलीन देवोल आणि यस्तिका भाटियाने भारताच्या टी20 संघात पुनरागमन केले आहे. त्यांना मागील काही मालिकांमध्ये भारतीय संघातून वगळले होते. पण नुकत्याच झालेल्या महिला टी20 चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत त्यांनी शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा पुन्हा भारताच्या टी20 संघासाठी विचार करण्यात आला आहे.

त्याचबरोबर अंजली सारवाणी हिला पहिल्यांदाच भारताच्या संघात स्थान मिळाले आहे. डावखरी वेगवान गोलंदाज असलेली अंजली रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते.

तसेच नेट गोलंदाज म्हणून मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर आणि सिमरन बहादूर यांची निवड झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवानी, देविका वैद्य, एस मेघना, ऋचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देवोल

नेट गोलंदाज - मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर आणि सिमरन बहादूर

भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, टी20 मालिका

9 डिसेंबर - पहिला टी20 सामना, डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई

11 डिसेंबर - दुसरा टी20 सामना, डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई

14 डिसेंबर - तिसरा टी20 सामना, सीसीआय, मुंबई

17 डिसेंबर - चौथा टी20 सामना, सीसीआय, मुंबई

20 डिसेंबर - पाचवा टी20 सामना, सीसीआय, मुंबई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT