India Women's Cricket Team X/BCCIWomen
क्रीडा

INDW vs AUSW: पहिल्याच दिवसावर भारताचे वर्चस्व! ऑस्ट्रेलियाला 'ऑलआऊट' केल्यानंतर स्मृतीची अर्धशतकाकडे वाटचाल

India Women vs Australia Women: वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटीत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले.

Pranali Kodre

India Women vs Australia Women, Test Match at Wankhede Stadium, Mumbai

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात गुरुवारपासून (21 डिसेंबर) कसोटी सामना सुरु झाला आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारतीय महिला संघाने पहिल्या डावात 1 बाद 98 धावा केल्या आहेत. अद्याप भारतीय संघ 121 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताकडून शफली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी सलामीला 91 धावांची भागीदारी केली. पण शफालीला 40 धावांवर 17 व्या षटकात जेस जोनासनने पायचीत केले. यानंतर पहिला दिवस संपला तेव्हा स्मृती मानधना 43 धावांवर नाबाद खेळत आहे, तर स्नेह राणा 4 धावांवर नाबाद आहे.

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 77.4 षटकात 219 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली होती.

ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड सलामीला फलंदाजीला उतरले होते. मात्र पहिल्याच षटकात लिचफिल्ड एकही चेंडू न खेळता धावबाद झाली, तर एलिस पेरीला दुसऱ्या षटकात पुजा वस्त्राकरने त्रिफळाचीत केले. त्यानंतर बेथ मुनीला ताहलिया मॅकग्राने आक्रमक खेळत साथ दिली होती. त्यांच्यात 80 धावांची भागीदारीही झाली.

मात्र अर्धशतक केलेल्या मॅकग्राला 21 व्या षटकात स्नेह राणाने माघारी धाडले. मॅकग्राने 50 धावांची खेळी केली. काहीवेळात मुनीलाही 40 धावांवर पुजा वस्त्राकरने बाद करत ऑस्ट्रेलियाचा चौथा धक्का दिला.

दुसऱ्या सत्रात कर्णधार एलिसा हेली आणि ऍनाबेल सदरलँडने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु 46 व्या षटकात हेलीला दिप्ती शर्माने त्रिफळाचीत केले, तर 51 व्या षटकात सदरलँडला पुजा वस्त्राकरने पायचीत पकडले. हेलीने 38 धावा केल्या, तर सदरलँडने 16 धावा केल्या. लगेचच ऍश्ले गार्डनर (11) आणि ऍलेना किंग (5) या देखील स्वस्तात बाद झाल्या.

अखेरीस जेस जोनासन आणि किम गार्थने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण जोनासनला १९ धावांवर दिप्तीने बाद केले, तर अखेरची विकेट लॉरेन चिटलीला स्नेह राणाने 6 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. अखेरीस ग्रॅथ 28 धावांवर नाबाद राहिली.

भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना पुजा वस्त्राकरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर स्नेह राणाने 3 विकेट्स घेतल्या आणि दिप्ती शर्माने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT