INDW vs AUSW Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs AUSW: दुसरा दिवस भारतीय महिला संघाच्या नावावर; 157 धावांची घेतली अभेद्य आघाडी!

IND W vs AUS W test Match Day-2: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे.

Manish Jadhav

IND W vs AUS W test Match Day-2: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला संघाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचा संघ 219 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावाच्या आधारे भारताने 157 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात 7 गडी गमावून 376 धावा केल्या आहेत. 121 चेंडूत 73 धावा करुन बाद झालेल्या जेमिमाह रॉड्रिग्जच्या रुपाने भारताने दुसऱ्या दिवशी शेवटची विकेट गमावली. यानंतर दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी डावाची धुरा सांभाळत शतकी भागीदारी करत विकेट पडू दिली नाही. पूजा 33 आणि दीप्ती 70 धावा करुन नाबाद परतल्या.

दरम्यान, स्मृती मंदानाने दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपले अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दिवशी 43 धावा केल्यानंतर ती नाबाद होती. मंदानाने 68 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारताला दिवसाचा पहिला आणि डावाचा दुसरा झटका स्नेह राणाच्या रुपाने बसला, तिने 57 चेंडूत 9 धावा केल्या. अॅश्ले गार्डनरने तिला बोल्ड केले. भारताला तिसरा मोठा झटका स्मृती मंदानाच्या रुपाने बसला, जी 74 धावा करुन धावबाद झाली.

दुसरीकडे, भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जनेही शानदार अर्धशतक झळकावले. तिच्यापाठोपाठ ऋचा घोषनेही अर्धशतक झळकावले, मात्र ती 52 धावा करुन बाद झाली. लवकरच कर्णधार हरमनप्रीत कौरही एलबीडब्ल्यू आऊट झाली. भारताला सहावा धक्का यास्तिका भाटियाच्या रुपाने बसला, जी केवळ एक धाव करु शकली. जेमिमाह रॉड्रिग्ज 121 चेंडूत 73 धावांची दमदार खेळी खेळून बाद झाली. यानंतर दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांच्यात आठव्या विकेटसाठी 248 चेंडूत 102 धावांची भागीदारी झाली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला. बेथ मूनीने 40, ताहिला मॅकग्राने 50 आणि कर्णधार अॅलिसा हिलीने 38 धावा केल्या. याशिवाय, किम गर्थने 28 धावा करुन नाबाद राहिली. सदरलँड 16 धावा केल्यानंतर, गार्डनर 11 धावा केल्यानंतर, जोनासेन 19 धावा केल्यानंतर, लॉरेन चीटल सहा धावा केल्यानंतर आणि अलाना किंग पाच धावा केल्यानंतर बाद झाल्या. फोबी लिचफिल्डला खातेही उघडता आले नाही, तर एलिस पेरी चार धावा करुन बाद झाली. भारताकडून पूजा वस्त्राकरने चार विकेट घेतल्या. तर स्नेह राणाने तीन विकेट घेतल्या. दीप्ती शर्माने दोन विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Injury Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, 'बीसीसीआय'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Goa Murder Case: पीर्ण येथील हत्येचं गूढ 15 तासांत उलगडलं, मुख्य आरोपीला अटक; साथीदारांचा शोध सुरू

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

SCROLL FOR NEXT