Alyssa Healy - Harmanpreet Kaur X/BCCIWomen
क्रीडा

INDW vs AUSW: भारत-ऑस्ट्रेलियासाठी 'निर्णायक' सामना; मुंबईत रंगणार T20I मालिका विजयासाठी थरार

India Women vs Australia Women: मंगळवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील T20I मालिकेचा अखेरचा सामना कुठे अन् कसा पाहणार जाणून घ्या.

Pranali Kodre

India Women vs Australia Women, 3rd T20I Match at Mumbai:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सध्या टी20 मालिका चालू आहे. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी (9 जानेवारी) रंगणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारताच्या दौऱ्यातील अखेरचा सामना आहे.

मंगळवारी नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्सने विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे सध्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झालेली आहे.

त्यामुळे आता मंगळवारी होणारा तिसरा सामना जो संघ जिंकेल, तो संघ ही मालिकाही जिंकेल. जर भारतीय संघाने तिसरा टी20 सामना जिंकला, तर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका जिंकेल. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका जिंकण्याची दुसरी वेळ असेल.

भारतीय महिला संघाने मायदेशात यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदाही टी20 मालिका जिंकलेली नाही. तसेच भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदाच टी20 मालिका जिंकली आहे, ही मालिका ऑस्ट्रेलियामध्ये 2016 साली झाली होती. त्या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता.

सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात होणारा तिसरा टी20 सामना मंगळवारी जिओ सिनेमा ऍप किंवा वेबसाईटवर ऑनलाईन पाहाता येणार आहे. तसेच स्पोर्ट्स 18चॅनेलवरही टीव्हीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

यातून निवडले जातील प्लेइंग इलेव्हन -

  • भारतीय महिला संघ - स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितस साधू, मन्नत कश्यप, सायका इशाक, कनिका आहुजा, यस्त भाटिया, मिन्नू मणी

  • ऑस्ट्रेलिया महिला संघ - एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍश्ले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ग्रेस हॅरिस, ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शट, डार्सी ब्राउन, हिदर ग्रॅहम, एलाना किंग, जेस जोनासेन, किम गर्थ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT