Austrlian Player Dainik Gomantak
क्रीडा

INDW Vs AUSW: पहिल्या वनडेत टीम इंडियाचा दारुण पराभव, जेमिमाहची दमदार खेळी व्यर्थ!

India Women vs Australia Women 1st ODI: ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन महिला संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Manish Jadhav

India Women vs Australia Women 1st ODI: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन महिला संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी करणाऱ्या फोबी लिचफिल्डची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. फलंदाजी करताना फोबी लिचफिल्डने 89 चेंडूत 78 धावांची शानदार खेळी केली.

टीम इंडियाने 282 धावा केल्या

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 8 गडी गमावून 282 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान जेमिमाने 7 शानदार चौकार लगावले. याशिवाय, यास्तिका भाटियाने 49, रिचा घोषने 21 आणि दीप्ती शर्माने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना गार्डनर आणि जॉर्जिया वेरहॅमने प्रत्येकी 2 बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाने 46.3 षटकांत विजय मिळवला

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने 46.3 षटकात 4 गडी गमावून 282 धावांचे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 78 धावा केल्या. याशिवाय, एलिस पेरीने 75 धावा, बेथ मुनीने 42 धावा आणि ताहलिया मॅकग्राने 68 धावा केल्या. टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना रेणुका सिंग, पूजा, दीप्ती आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

Goa News: खाणकाम मोफत मिळालेले नाही... अमित पाटकरांचा पालेकरांना हल्लाबोल; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT