INDW vs AUSW: टेस्टनंतर वनडेत टीम इंडिया दाखवणार दम; घरच्या मैदानावर असा आहे रेकॉर्ड!

India Women Cricket Team: ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

INDW vs AUSW 1st ODI: भारतीय महिला संघ सलग दोन कसोटी सामन्यांतील विजयानंतर गुरुवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आपला रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचा विक्रमी 347 धावांनी पराभव केल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना 8 गडी राखून जिंकला. वनडे मालिकेतील सर्व सामने वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील.

वनडेमध्ये टीम इंडिया दाखवणार ताकद!

आगामी सामन्यांमध्येही विजयी मालिका सुरु ठेवण्याचा भारताचा निर्धार आहे, पण सुरुवातीपासूनच 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे सोपे नाही हे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला चांगलेच ठाऊक असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत, तर 40 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. घरच्या मैदानावर भारताचा विक्रम वाईट आहे.

India Women Cricket Team
INDW vs AUSW: टीम इंडियाचा फोटो काढताना एलिसा हेलीकडून झाली मोठी चूक, स्वत:च दिली कबुली; पाहा Video

घरच्या मैदानावर असा आहे रेकॉर्ड!

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या भूमीवर खेळलेल्या 21 एकदिवसीय सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकले आहेत, तर 17 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. फेब्रुवारी 2007 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या सातही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने मार्च 2012 मध्ये वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे दोन एकदिवसीय सामने खेळले होते, ज्यात त्यांना 221 धावांनी आणि 5 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 30 धावांनी विजय मिळवला.

India Women Cricket Team
INDW vs AUSW: दुसरा दिवस भारतीय महिला संघाच्या नावावर; 157 धावांची घेतली अभेद्य आघाडी!

अमोल मजुमदारच्या रुपाने नवा प्रशिक्षक

पण आता भारताकडे हरमनप्रीतच्या रुपाने नेतृत्व आणि अमोल मजुमदारच्या रुपाने नवा प्रशिक्षक आहे. भारतीय संघाला 2025 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरु करण्याची आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम सुधारण्याची ही संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेसाठी भारताने आपल्या संघात श्रेयंका पाटील, सायका इसाक, मन्नत कश्यप आणि तीतास साधू या नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. जेमिमाह रॉड्रिग्सने यावर्षी भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 129 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाकडून, डावखुरी सलामीवीर फलंदाज बेथ मुनीने 11 सामन्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांसह 387 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com