India Women Cricket Team X/BCCIWomen
क्रीडा

INDW vs AUSW: एक-दोन नाही, तब्बल सात कॅच सोडले, टीम इंडियाच्या पराभवाचं हेच प्रमुख कारण

India vs Australia Women: भारतीय महिला संघाचे खराब क्षेत्ररक्षण हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना पराभूत होण्याचे प्रमुख कारण ठरले.

Pranali Kodre

India Women dropped 7 catches in 2nd ODI Against Australia at Wankhede Stadium Mumbai:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात शनिवारी (30 डिसेंबर) वनडे मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाला केवळ 3 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या सामन्यात भारतीय खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणादरम्यान मोठ्या चूका झाल्या, हे पराभवाचे मोठे कारणही ठरले.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्ड आणि कर्णधार एलिसा हेलीने डावाची सुरुवात केली. दरम्यान, पहिल्याच षटकात भारताला लिचफिल्डला बाद करण्याची भारतीय संघाला संधी होती.

रेणूका सिंगने गोलंदाजी केलेल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर लिचफिल्डचा झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र अमनज्योत कौरने तिचा झेल सोडला. यानंतरही लिचफिल्डला आणखी दोनदा जीवनदान मिळाले.

रेणूकानेच टाकलेल्या पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर स्मृती मानधनाकडून मिड-ऑफला झेल सुटला. तिला जमीनीलगत चेंडू पकडता आला नाही. तसेच 8व्या षटकात पूजा वस्त्राकरच्या गोलंदाजीवर लिचफिल्डला यास्तिका भाटीयाकडून जीवदान मिळाले. या जीवदानांचा फायदा लिचफिल्डने उचलला आणि 63 धावांची खेळी केली.

याशिवाय याच सामन्यात अर्धशतक केलेल्या एलिस पेरीलाही 17 व्या षटकात जीवदान मिळाले होते. स्नेह राणाला तिच्याच गोलंदाजीवर पेरीचा झेल घेण्याची संधी होती. मात्र, तिच्याकडून ही संधी हुकली. पेरीने याचा फायदा घेत 50 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डावही सावरला.

44 व्या षटकात दीप्ती शर्माच्या गोलेदाजीवर ऍनाबेल सदरलँडचा झेल स्मृती मानधानाने सोडला. तिने खालच्या फळीत फलंदाजी करत 23 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.

याशिवाय पुजा वस्त्राकरने गोलंदाजी केलेल्या 48 व्या आणि रेणूकाने गोलंदाजी कलेल्या 49 व्या षटकातही दोन झेल सुटली. 48 व्या षटकात एलेना किंगचा झेल हरमनप्रीत कौरने मिडविकेटला सोडला.

तसेच 49 व्या षटकातही दीप्तीकडून किंगचाच झेल सुटला. विशेष म्हणजे 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या किंगने 17 चेंडूत नाबाद 28 धावांची खेळी केली.

भारताने एकूण या सामन्यात 7 झेल सोडले. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला आणि त्यांनी 50 षटकात 8 बाद 258 धावा केल्या. भारताकडून दीप्तीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 259 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 षटकात 8 बाद 255 धावाच करता आल्या. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोषने 96 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ऍनाबेल सदरलँडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT