Smriti Mandhana Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games Cricket: भारतीय महिलांनी जिंकलं ऐतिहासिक सुवर्ण पदक! फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

India Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India Women's Cricket Team won Gold Medal in 19th Asian Games Hangzhou, China:

चीनमध्ये सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. महिलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्या सोमवारी (२५ सप्टेंबर) भारतीय संघाने श्रीलंकेला १९ धावांनी पराभूत केले.

मल्टीस्पोर्ट्समधील हे भारतीय क्रिकेट संघाचे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी भारतीय महिला संघाने २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता.

दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ११७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकात ८ बाद ९७ धावाच करता आल्या.

श्रीलंकेकडून हासिनी परेराने २५ धावांची खेळी केली, तर निलाक्षी डी सिल्वाने २३ धावांची खेळी केली. तसेच आशाडी रनसिंघेने १९ धावा केल्या. मात्र या तिघींव्यतिरिक्त कोणालाही १५ धावांचा टप्पा पार करता आला नाही.

भारताकडून तितास साधूने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाडने २ विकेट्स घेतल्या, तर दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यातून पुनरागमन करताना नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून सलामीला आलेल्या शफली वर्मा ९ धावांवरच बाद झाली.

मात्र त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमाह रोड्रिग्ज यांनी भारताचा डाव सांभाळत ७३ धावांची भागीदारी केली. पण मानधना १५ व्या षटकात ४५ चेंडूत ४६ धावा करून बाद झाली. त्यानंतर ऋचा घोष, हरमनप्रीत कौर आणि पुजा वस्त्राकर यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. मात्र रोड्रिग्जने ४० चेंडूत ४२ धावांची खेळी केली.

त्यामुळे भारताने २० षटकात ७ बाद ११६ धावा उभारल्या होत्या. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधनी, सुगंदिका कुमारी आणि इनोका रनविरा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

या स्पर्धेत श्रीलंका अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने त्यांना रौप्यपदक मिळाले, तर बांगलादेशने पाकिस्तानचा तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात ५ विकेट्सने पराभव करत कांस्य पदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT