Asian Games 2023: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण'वेध, वर्ल्ड रेकॉर्डलाही घातली गवसणी

Gold Medal in Hangzhou 2022 Asian Games: भारतीय नेमबाजांनी भारताला विश्वविक्रमासह १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले.
India's Men's 10m Air Rifle Team
India's Men's 10m Air Rifle TeamTwitter
Published on
Updated on

India's 1st Gold Medal at 19th Asian Games Hangzhou, China: आशियाई क्रीडा स्पर्धा सध्या चीनमधील होंगझाऊ येथे सुरू आहे. या स्पर्धेचे यंदा १९ वे पर्व असून भारताच्या खात्यात पहिले सुवर्णपदक जमा झाले आहे.

भारताला पहिल्या दिवशी रोइंगमध्ये तीन आणि नेमबाजीत दोन असे एकूण ५ पदके मिळाली होती. आता भारताला दुसऱ्या दिवसाच्या (२५ सप्टेंबर) सुरुवातीलाच सुवर्णपदक मिळाले आहे.

भारताकडून पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण वेध घेतला आहे. या भारतीय संघात दिव्यांश पनवार, ऐश्वर्य तोमर आणि रुद्रांक्ष पाटील यांचा समावेश आहे.

India's Men's 10m Air Rifle Team
Asian Games: पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात 5 पदके, रोइंग अन् शूटींगमध्ये 'या' खेळाडूंचा डंका

दिव्यांश पनवार, ऐश्वर्य तोमर आणि रुद्रांक्ष पाटील या तिघांनी मिळून केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर त्यांनी नवा विश्वविक्रमही रचला आहे.

त्यांनी १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सर्वाधिक स्कोअर करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्यांचा अंतिम सामन्यात १८९३.७ इतका स्कोअर होता.

याच प्रकारात कोरियाने १८९०.१ स्कोअर करत रौप्य पदक जिंकले, तसेच चीनने १८८८.२ स्कोअर करत कांस्य पदक जिंकले.

दरम्यान लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऐश्वर्य तोमर आणि रुद्रांक्ष पाटील या दोघांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात एकेरीत अंतिम फेरीही गाठली आहे.

खरंतर दिव्यांश पनवार देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे, मात्र एका देशाचे केवळ दोनच खेळाडू अंतिम सामना खेळू शकत असल्याने पनवारला हा अंतिम सामना खेळता येणार नाही.

India's Men's 10m Air Rifle Team
Asian Games Hockey: एक, दोन नाही, तब्बल 16 गोल! भारताची उझबेकिस्तान हरवत दणक्यात सुरुवात

दरम्यान, भारताने दुसऱ्या दिवशी रोइंगमधील आणखी दोन पदकेही जिंकले. चार जणांच्या सांघिक प्रकारात भारताला कांस्य पदक मिळाले आहे.

भारताच्या संघात जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार आणि आशिष यांचा समावेश होता. त्यांनी ६:१०.८१ सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. या प्रकारात उझबेकिस्तानच्या संघाने सुवर्णपदक, तर चीनच्या संघाने रौप्यपदक जिंकले.

तसेच पुरुषांच्या क्वाड्रपल स्कल प्रकारात भारतीय संघाने कांस्य पदक जिंकले आहे. भारतीय संघात सतनाम सिंग, परमिंदर सिंग, सुखमीत आणि जकर खान यांचा समावेश होता. त्यांनी ६:०८.६१ सेंकद वेळ नोंदवली. या प्रकारात चीनला सुवर्णपदक मिळाले, तर उझबेकिस्तानच्या संघाने रौप्य पदक जिंकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com