Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: भारताची सुपर-4 मध्ये धडक, पाकिस्तानविरुद्ध 'या' दिवशी पुन्हा लढत, पाहा संपूर्ण टाईमटेबल

Asia Cup Super-4 Schedule: भारत आणि पाकिस्तान संघांनी आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत प्रवेश केल्याने या दोन संघात पुन्हा सामना पाहायला मिळणार आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023 Super-4 Schedule:

सोमवारी (4 सप्टेंबर) भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीत नेपाळला 10 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. अ गटातून सुपर-4 फेरीत जाणारा भारत पाकिस्ताननंतरचा दुसरा संघ ठरला आहे.

त्यामुळे आता सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने असणार आहेत. हे दोन्ही संघ सुपर-4 फेरीत 10 सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान संघाचा साखळी फेरीतील सामना पहिल्या डावानंतर पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

दरम्यान अ गटातून भारत आणि पाकिस्तान संघाने सुपर-४ मध्ये जागा मिळवली असली, तरी अद्याप ब गटातून बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यापैकी कोणते दोन संघ सुपर-4 साठी पात्र ठरणार हे अनिश्चित आहे. मंगळवारी (5 सप्टेंबर) लाहोरला होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर ब गटाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, यापूर्वीच आशियाई क्रिकेट संघटनेने स्पष्ट केल्यानुसार साखळी फेरीनंतर गुणतालिकेतील स्थान कोणतेही असले तरी सुपर-4 साठी अ गटामधून पाकिस्तानला ए1 आणि भारताला ए२ समजले जाईल. त्याचबरोबर जर या दोन्ही संघांपैकी कोणताही संघ सुपर-4 साठी अपात्र ठरला, तर त्या संघाची जागा नेपाळ घेईल.

ग्रुप ए प्रमाणेच ग्रुप बी मधून सुपर-4 साठी श्रीलंकेला बी1 आणि बांगलादेशला बी2 समजले जाईल. तसेच या दोन्ही संघांपैकी कोणताही संघ सुपर-4 साठी अपात्र ठरला, तर त्या संघाची जागा अफगाणिस्तान घेईल.

यानुसार अ गटातून भारत आणि पाकिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश केला असल्याने त्यांना कोणत्या दिवशी सामने खेळायचे आहेत, हे स्पष्ट झाले आहे. आता ब गटातून कोणते संघ सुपर-4 मध्ये येणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता असणार आहे.

दरम्यान, सुपर फोर फेरीत प्रवेश करणारे चारही संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळतील.

आशिया चषक 2023 सुपर-4 फेरीचे वेळापत्रक

  • 6 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध बी2 - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 9 सप्टेंबर - बी1 विरुद्ध बी2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 10 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध भारत - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 12 सप्टेंबर - भारत विरुद्ध बी1 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 14 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध बी1 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 15 सप्टेंबर - भारत विरुद्ध बी2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT