Ajinkya Rahane | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma - Ajinkya Rahane: 'मी अजूनही तरुणच...', रहाणेच्या त्या उत्तरावर कॅप्टन रोहितला आवरेना हसू, Video एकदा पाहाच

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे पत्रकारांना उत्तरे देत असताना रोहित शर्मा त्याच्याबरोबर मस्ती करताना दिसला.

Pranali Kodre

India's Batter Ajinkya Rahane’s response in press Conference leaves Captain Rohit Sharma in splits, watch Video:

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल सामना 12 ते 16 जुलैदरम्यान डॉमिनिकाला होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ सरावाबरोबर थोडी मजा-मस्ती करतानाही दिसला.

या मालिकेतून अजिंक्य राहणे पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ही पत्रकार परिषद मैदानावर घेण्यात आली होती.

यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील तिथे उपस्थित होता, त्यावेळी तो रहाणेबरोबर मस्ती करतानाही दिसला. या क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयनेही शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसते एका पत्रकाराने अजिंक्य रहाणेला 'इतका अनुभव आल्यानंतर या वयात तू या मालिकेकडे कसा पाहातो,' अशा अर्थाचा प्रश्न विचारला. त्यावर राहणेने उत्तर दिले की 'या वयात म्हणजे मी अजूनही तरुणच आहे.' रहाणेचे उत्तर ऐकून रोहितला त्याचे हसू आवरता आले नाही.

नंतर रोहितने पत्रकाराची भूमिका स्विकारत रहाणेला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याने रहाणेला वेस्ट इंडिजमध्ये फलंदाजी करण्याबद्दल आणि युवा खेळाडूंना त्याचा संदेश देण्याबद्दल विचारले.

त्यावर रहाणे म्हणाला, 'माझा सर्व युवा खेळाडूंना हाच संदेश आहे की फलंदाज म्हणून तुमच्यात संयम असणे महत्त्वाचे आहे. तसेच मैदानात लक्ष केंद्रीत करणे आणि लक्ष विचलित होऊ न देणे महत्त्वाचे आहे.'

दरम्यान, मध्येच पाऊस आल्याने सर्वांना आत पळत जावे लागले.

याशिवाय रहाणेने पत्रकारांना असेही सांगितले की त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. रहाणे पुढे म्हणाला, 'माझ्यासाठी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम चांगला राहिला आहे. फलंदाज म्हणून माझ्यातील आत्मविश्वास वाढला आहे, तसेच गेल्या एक-दीडवर्षापासून मी माझ्या फिटनेसवर काम केले आहे.'

रहाणेने जूनमध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्ध तो कशी कामगिरी करणार याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT