Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

OUT की NOT OUT? ईशान किशनच्या कॅचवरुन ड्रामा, थर्ड अंपायरच्या निर्णयावर संतापले वेस्ट इंडिजचे खेळाडू, VIDEO व्हायरल

Ishan Kishan Catch Controversy: लखनौच्या इकाना स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान एक रंजक आणि वादग्रस्त प्रसंग पाहायला मिळाला.

Manish Jadhav

Ishan Kishan Catch Controversy: लखनौच्या इकाना स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान एक रंजक आणि वादग्रस्त प्रसंग पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान युवा फलंदाज ईशान किशनच्या एका कॅचबाबत थर्ड अंपायरच्या निर्णयावरुन राळ उडाली. वेस्ट इंडिजचा खेळाडू मॅथ्यू फोर्डने बाउंड्रीजवळ डाइव्ह मारुन अप्रतिम कॅच घेतला, ज्यावर कॅरेबियन संघाला ईशान बाद झाल्याचा पूर्ण विश्वास होता. मात्र, रिप्ले पाहिल्यानंतर अंपायरने ईशानला नॉट आऊट दिल्याने खेळाडूंनी संताप व्यक्त केला.

ही घटना भारताच्या (India) डावातील अकराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर घडली. स्प्रिंगरच्या गोलंदाजीवर ईशान किशनने डीप कव्हरच्या दिशेने जोरदार शॉट खेळला. तिथे फिल्डिंग करत असलेल्या मॅथ्यू फोर्डने प्रचंड वेगाने धावत जाऊन डाईव्ह मारत चेंडू कॅच केला. प्रथमतः हा कॅच अतिशय उत्तम वाटल्यामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला आणि काही क्षण स्कोरकार्डवरही ईशान किशनच्या नावापुढे आऊट असे लिहून आले. परंतु, पंचांनी संभ्रम टाळण्यासाठी हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला.

टीव्ही रिप्लेमध्ये फोर्ड जमिनीवर पडताना चेंडू त्याच्या हातातून सुटून जमिनीला लागल्याचे स्पष्ट दिसत होते. पूर्ण तपासणी केल्यानंतर तिसऱ्या पंचांनी ईशान किशनला नॉट आऊट दिले. या निर्णयामुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू आक्रमक आणि नाखूश झाले, कारण त्यांच्या मते फोर्डने कॅच घेतला होता. हा जीवनदान मिळालेला क्षण भारतासाठी अत्यंत मोलाचा ठरला, कारण सुरुवातीलाच सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार शतक ठोकत भारताला सहज विजय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Voter List Case: 'सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे' म्हणत ECIची स्थगितीची मागणी; गोवा खंडपीठाचा नकार, 'दोन्ही प्रकरणांतील कायदेशीर मुद्दे वेगळे'

Goa Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेचा लाभ 75 हजारांपर्यंत पोहोचला, पण 1 लाख अर्जांचा खोळंबा; नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबण्याची शक्यता

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT