Virat Kohli gives death stare to Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: विराटचा एक कटाक्ष अन् पंड्याने फिरवली नजर, पहिल्या वनडेतील Video व्हायरल

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान विराट कोहली हार्दिक पंड्यावर चिडलेला दिसला होता.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुवाहाटीमध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहलीचा मोठा वाटा राहिला. पण याच सामन्यादरम्यान तो एका क्षणी हार्दिक पंड्यावर चिडला होता, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

झाले असे की भारतीय संघाच्या डावात 43 व्या षटकात कसून रजितच्या एका चेंडूवर विराटने एक शॉट खेळला. त्यावर विराट आणि हार्दिकने एक धाव चपळाईने धावली. त्यानंतर विराट दुसरी धाव घेण्यासाठीही अर्ध्या खेळपट्टीपर्यंत पोहचला होता, मात्र हार्दिकने दुसरी धाव घेण्यास नाकारले.

(Virat Kohli gives death stare to Hardik Pandya)

हार्दिकच्या या नकाराबद्दल विराटने नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याने हार्दिकवर एक रागीट कटाक्षही टाकला. त्यानंतर हार्दिकने त्याच्या नजरेशी नजर मिळवली नाही. त्यानंतर 45 व्या षटकात रजितानेच हार्दिकला 14 धावांवर बाद केले.

दरम्यान, विराटने या सामन्यात त्याचे वनडे क्रिकेटमधील 45 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 73 वे शतक पूर्ण केले. त्याने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला.

त्याच्याव्यतिरिक्त भारताकडून या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 83 धावांची आणि शुभमन गिलने 70 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 373 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून कसून रजिताने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 374 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून दसून शनकाने नाबाद 108 धावांची खेळी केली. तसेच पाथम निसंकाने 72 धावांची खेळी केली आणि धनंजय डी सिल्वाने 47 धावांचे योगदान दिले आहे. मात्र, अन्य कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे श्रीलंका संघ 50 षटकात 8 बाद 306 धावाच करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT