India vs Sri Lanka Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: भारत की श्रीलंका, टी20मध्ये कोण वरचढ? पाहा दोन्ही संघांची आमने-सामने कामगिरी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आमने-सामने कामगिरीबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Sri Lanka, T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 जानेवारीपासून 3 सामन्यांची टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

त्यानंतर 5 जानेवारी रोजी पुण्यात आणि 7 जानेवारी रोजी राजकोट येथे अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी20 सामना होईल. हे तिन्ही टी20 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.

भारत-श्रीलंका आमने-सामने आकडेवारी

भारत आणि श्रीलंका यांच्यात आत्तापर्यंत 26 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 17 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर 8 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. त्याचबरोबर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

या दोन संघामध्ये शेवटचा टी20 सामना गेल्यावर्षी आशिया चषकात झाला होता. दुबईला झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

तसेच भारत आणि श्रीलंका यांच्यात भारतात 14 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 11 सामने भारताने जिंकले आहेत. तसेच 2 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. त्याचबरोबर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

सर्वाधिक विकेट्स आणि धावा करणारे क्रिकेटर

भारत आणि श्रीलंका यांच्यात आत्तापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा आत्तापर्यंत रोहित शर्माने केल्या आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध 19 टी20 सामन्यांत 411 धावा केल्या आहेत.

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे शिखर धवन (375) आणि विराट कोहली (339) आहेत. तसेच श्रीलंकेकडून भारताविरुद्ध टी20मध्ये सर्वाधिक धावा दसून शनकाने केल्या आहेत. त्याने 306 धावा केल्या आहेत.

तसेच भारत आणि श्रीलंका यांच्यात आत्तापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये 20 विकेट्ससह युजवेंद्र चहल अव्वल क्रमांकावर आहे. १६ विकेट्ससह दुश्मंता चमिरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 14 विकेट्ससह आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर कुलदीप यादव आणि दसून शनका यांनी प्रत्येकी 12 विकेट्स घेतल्या असून ते संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT