Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL, T20I: हिटमॅनच्या रेकॉर्डला श्रीलंकन कर्णधाराचा धोका, नंबर वनची जागा...

श्रीलंकेच्या कर्णधाराला रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.

Pranali Kodre

Dasun Shanaka can break Rohit Sharma's Record: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिका 3 जानेवारीपासून सुरु होत आहे. या मालिकेदरम्यान श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाला रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.

शनका मोडू शकतो रोहितचा विक्रम

रोहितला दुखापतीतून पूर्ण बरा होऊन येण्यासाठी निवड समीतीने श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे आता शनका त्याचा भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 सामन्यांत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडू शकतो.

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 सामन्यांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत 19 षटकारांसह रोहित अव्वल क्रमांकावर आहे. तसेच शनका 18 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्याने आता 1 षटकार जरी मारला, तरी तो रोहितच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.

या यादीत रोहित आणि शनका यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर कुशल परेरा आहे. त्याने भारताविरुद्ध 14 षटकार मारले आहेत.

तसेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही शनकाला 106 धावा करताच अव्वल क्रमांकावर येण्याची संधी आहे. सध्या शनका या यादीत 306 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

या यादीत 411 धावांवर रोहितच अव्वल क्रमांकावर आहे, तर शिखर धवन 375 धावांवर दुसऱ्या आणि 339 धावांवर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे तिन्ही खेळाडू आगामी भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाहीत. त्याचमुळे शनकाला या विक्रमाच्या यादीत या तिघांनाही मागे टाकण्याची संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bear Attacks:अळंबी आणण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला, धारगे - तांबडीसुर्ला येथील घटना

Trump Tariffs India: ट्रम्प यांचा पुन्हा भारताला धक्का, आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची केली घोषणा

Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

Sunburn Festival 2025: यंदा 'सनबर्न' मुंबईत, पण आमदार मायकल लोबो गोव्यासाठी आग्रही

Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT