Team India Playing XI Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियात मोठा बदल, तर श्रीलंकेनेही दोघांना वगळलं, पाहा Playing XI

कोलकाता येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेसाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Pranali Kodre

India vs Sri Lanka, 2nd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या वनडेसाठी युजवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. चहलने पहिल्या सामन्यात डाईव्ह मारली होती. त्यामुळे त्याला झालेल्या दुखापतीतून तो सावरला नसल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या वनडेसाठी संधी मिळालेली नाही.

(India vs Sri Lanka: Both teams made changes in Playing XI for 2nd ODI)

या एका बदलाव्यतिरिक्त पहिल्या वनडेत खेळलेला संघच दुसऱ्या वनडेसाठीही कायम करण्यात आला आहे. म्हणजेच आता सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना वनडे संघात पुनरागमनासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. या दोघांना पहिल्या वनडेसाठीही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.

तसेच या सामन्यासाठी श्रीलंका संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. त्यांनी दिलशान मदुशंका आणि पाथम निसंका यांना संघातून बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी नुवानिदू फर्नांडो आणि लहिरू कुमारा यांना संघात संधी मिळाली आहे. फर्नांडोचे हे वनडे पदार्पण असणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील या वनडे मालिकेत पहिला सामना 67 धावांनी जिंकून भारतीय संघ 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर श्रीलंका मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने दुसऱ्या सामन्यात विजयाचा प्रयत्न करतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, उमरान मलिक, मोहम्मद सिराज

श्रीलंका संघ - कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, नुवानिदू फर्नांडो, दसून शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, लाहिरू कुमारा, कसुन राजिथा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT