Hardik Pandya statement on no-ball | India vs Sri Lanka Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: 'नो-बॉल टाकणे गुन्हाच...', पराभवानंतर भडकला कॅप्टन पंड्या

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 मालिकेतील भारतीय गोलंदाजांकडून टाकण्यात आलेल्या 7 नो-बॉलवर कर्णधार हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना पार पडला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला 16 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, भारतासाठी नो-बॉल पराभवाच्या मुख्य कारणांपैकी एक ठरले.

भारताकडून या सामन्यात एकूण 7 नो बॉल टाकले गेले, ज्यावर 30 पेक्षाही धावा श्रीलंकन संघाने काढले. या 7 नो-बॉलपैकी 5 नो-बॉल अर्शदीप सिंगने टाकले. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात सलग तीन चेंडूत तीन नो-बॉल टाकले होते. त्याच्याशिवाय उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 1 नो-बॉल टाकले.

याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने नो-बॉल टाकण्याचे समर्थन केलेले नाही. पण त्याने अर्शदीपला दोष दिलेला नाही.

हार्दिक म्हणाला, 'या परिस्थितीत अर्शदीपसाठी हे कठीण होते. ही बाब त्याला दोष देण्याची किंवा त्याबाबत कठोर होण्याची नाही. पण आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कोणत्याही प्रकारात नो-बॉल टाकणे गुन्हा आहे.'

'आपण काही चूका करतोच, पण त्या या स्तरावर नाही झाल्या पाहिजेत. सर्वाना हे काय आहे हे माहित आहे. आमच्यासाठी शिकण्याची गोष्ट ही आहे की ज्या गोष्टी आम्ही नियंत्रित करु शकतो, त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. तुमचा दिवस कधी चांगला असतो, कधी वाईट असते. पण तुम्ही मुळ गोष्टींपासून दूर जाऊ शकत नाही.'

भारताला या सामन्यात श्रीलंकेने 207 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 20 षटकात 8 बाद 190 धावाच करता आल्या. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि कर्णधार दसून शनका यांनी अर्धशतके केली. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तसेच 207 धावांचा पाठलाग करताना भारताकडून अक्षर पटेलने आक्रमक खेळताना 65 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 51 धावांची खेळी केली. पण या दोघांशिवाय अन्य भारतीय फलंदाज खास कामगिरी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे भारताला पराभवाचा धक्का बसला.

श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका, कसून रजिता आणि दसून शनका यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच चमिका करुणारत्ने आणि वनिंदू हसरंगाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हा सामना श्रीलंकेने जिंकला असल्याने 1-1 अशी मालिकेत बरोबरी झाली आहे. त्यामुळे 7 जानेवारी रोजी होणारा सामना निर्णायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT