Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SA: डर्बनमध्ये रंगणार पहिला T20 सामना; जाणून घ्या या मैदानावरील भारताचा रेकॉर्ड!

India vs South Africa: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याची तयारी जोरात सुरु आहे. भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर पोहोचला आहे.

Manish Jadhav

India vs South Africa: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याची तयारी जोरात सुरु आहे. भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर पोहोचला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मालिकेनंतर भारताला अफगाणिस्तानविरुद्ध फक्त टी-20 मालिका खेळण्याची संधी मिळेल, त्यानंतर थेट विश्वचषकासाठी जावे लागेल. या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना किंग्समीड येथील डर्बन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. चला तर मग या स्टेडियमवर भारताचा रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया...

भारताचा रेकॉर्ड खूपच खराब!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी, प्रथम या स्टेडियमवर भारताचा रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घ्या, जेणेकरुन या सामन्यातील विजय आणि पराभवाचा अंदाज लावता येईल. या स्टेडियमवर भारताने एकूण 14 सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटी, T20 आणि एकदिवसीय या तीनही फॉरमॅटचा समावेश आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या 14 सामन्यांमध्ये भारताने केवळ 3 सामने जिंकले आहेत, तर 9 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय, भारताचा एक सामना टाय झाला, तर एक सामना रद्द झाला. यावरुन भारताचा या स्टेडियमवरील रेकॉर्ड चांगला नसल्याचे स्पष्ट होते.

T20 सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक

दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सामना रात्री 9.30 पासून खेळवला जाईल. मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबरला होणार असून दुसरा सामना 12 डिसेंबरला होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिन्ही टी-20 सामने रात्री 9.30 वाजल्यापासून खेळवले जातील. दुसरा टी-20 सामना सेंट जॉर्ज पार्क, गेबरहा येथे खेळवला जाईल. टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत विश्वचषकापूर्वी भारताला ही मालिका जिंकता येते का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT