India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

India vs Pakistan: सुपर संडे की 'सूपर-डुपर संडे'? भारत-पाकिस्तान दोनवेळा भिडणार; पाहा कधी आणि कुठे होणार सामने?

India vs Pakistan Super Sunday double header: एकाच दिवशी भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ दोन वेगवेगळ्या मैदानांवर आणि दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

Sameer Amunekar

India vs Pakistan Super Sunday double header

१५ फेब्रुवारी हा दिवस जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसेल. या एकाच दिवशी भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ दोन वेगवेगळ्या मैदानांवर आणि दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पुरुष संघांचा टी-२० विश्वचषकातील 'हाय-व्होल्टेज' सामना आणि महिला 'अ' संघांचा 'आशिया कप रायझिंग स्टार्स'मधील मुकाबला, अशा दोन मोठ्या लढाया एकाच दिवशी पाहायला मिळणार असल्यानं क्रिकेटप्रेमींचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

कोलंबोत रंगणार विश्वचषकाचा महामुकाबला

२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील सर्वात बहुप्रतिक्षित सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता या सामन्याला सुरुवात होईल, तर ६:३० वाजता नाणेफेक केली जाईल. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे.

भारताने अमेरिका आणि नामिबियावर मात करत आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत, तर पाकिस्ताननेही त्यांचे पहिले दोन सामने खिशात घातले आहेत. त्यामुळे या सामन्यात विजयाची 'हॅट्ट्रिक' कोण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बँकॉकमध्ये महिला 'अ' संघांची प्रतिष्ठा पणाला

संध्याकाळच्या मोठ्या सामन्यापूर्वी, दुपारी १२:३० वाजता चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आणखी एका संघर्षाचा आनंद घेता येईल. एसीसी (ACC) आयोजित 'महिला आशिया कप रायझिंग स्टार्स' स्पर्धेत भारत 'अ' आणि पाकिस्तान 'अ' महिला संघ आमनेसामने येतील.

हा सामना थायलंडमधील बँकॉक येथील टेर्डथाई क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. उदयोन्मुख महिला खेळाडूंसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ असून, पहिल्या सामन्यात यूएईकडून पराभूत झालेल्या भारतीय महिला संघासाठी हा सामना विजयाचे खाते उघडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

दुपारपासून रात्रीपर्यंत क्रिकेटचा धमाका

एकाच दिवशी दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार असल्याने याला 'सुपर संडे' म्हटले जात आहे. दुपारी बँकॉकहून सुरु होणारा हा क्रिकेटचा प्रवास रात्री कोलंबोच्या मैदानावर संपेल. एका बाजूला आशिया चषकातील अस्तित्वाची लढाई असेल, तर दुसरीकडे विश्वचषकातील वर्चस्वाची लढाई. या दुहेरी धमाक्यामुळे सोशल मीडियापासून ते गल्लीबोळातील चर्चेपर्यंत सर्वत्र केवळ 'भारत विरुद्ध पाकिस्तान' याच सामन्यांची चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT