Rohit Sharma & Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs PAK: '...पाकिस्तानमध्ये हिंमत नाही', या दिग्गजाने केला मोठा दावा

BCCI vs PCB: आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले होते.

दैनिक गोमन्तक

India vs Pakistan Rivalry: आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले होते. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) म्हटले की, 'आम्ही 2023 च्या विश्वचषकासाठी आपला संघ भारतात न पाठवून बदला घेऊ शकतो.' मात्र, आता भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने दावा केला आहे की, '2023 चा विश्वचषक भारतात खेळण्यास पाकिस्तानची हिंमत नाही.'

'भारतात 2023 चा विश्वचषक खेळण्यास नकार पाकिस्तान देऊ शकणार नाही'

आकाश म्हणाला की, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आपल्या घोषणेवर टिकून राहू शकणार नाही. 2023 च्या विश्वचषकासाठी आपला संघ निश्चितपणे भारतात पाठवेल.' आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, 'पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला (Pakistan) जाणार नाही, मात्र एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान नक्कीच भारतात येईल, असे लेखी देऊ शकतो.'

या दिग्गजाने मोठे कारण सांगितले

आकाश चोप्रा एका यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, 'जर भारत सहभागी झाला नाही तर आशिया कप होणार नाही. आशिया कप हा विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत एका छोटा टूर्नामेंट आहे. विश्वचषक सोडणे म्हणजे तुम्ही ICC ला मिळणारा मोठा महसूल गमावाल.'

आशिया चषक भारतानुसार चालेल

आकाश पुढे म्हणाला की, 'एसीसी एक महासंघ आहे, परंतु भारत एसीसीकडून एक पैसाही घेत नाही हे फार कमी लोकांना माहिती आहे. प्रत्येकजण (ACC) तिजोरीतून ठराविक रक्कम घेतो, मग ती 40 लाख असो किंवा 80 लाख.'

एसीसीमध्ये भारत मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे

आकाश शेवटी म्हणाला की, 'भारत एसीसीमध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे. भारत पाकिस्तानला जाणार नाही हे मी तुम्हाला लेखी देऊ शकतो. आशिया चषक देखील तटस्थ ठिकाणी होणार आहे. मात्र पाकिस्तान नक्कीच भारतात विश्वचषक खेळायला येईल, जर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी ते लेखी देऊ शकतो. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे T20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

SCROLL FOR NEXT