Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: किंग कोहलीने ठोकलं 77 वे शतक! सचिन तेंडुलकरलाही पछाडत रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

India vs Pakistan: विराट कोहलीने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळताना 77 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले.

Pranali Kodre

India vs Pakistan Asia Cup 2023 Super Four Virat Kohli 77th International Century:

आशिया चषकात 2023 स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना रविवारी सुरू झाला आहे. पण रविवारी पावसामुळे हा सामना पूर्ण न झाल्याने राखीव दिवशी सोमवारी उर्वरित सामना खेळवला जात आहे. राखीव दिवशी केएल राहुलपाठोपाठ विराट कोहलीने शतक ठोकले आणि मोठा विश्वविक्रमही रचला.

या सामन्यात विराट कोहलीने केएल राहुलसह तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. याबरोबरच या दोघांनीही शतके केली आहेत. राहुलने 100 चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर विराटने 84 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह शतक पूर्ण केले.

विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 77 वे शतक आहे. तसेच हे त्याचे 47 वे शतक आहे. त्यामुळे विराट आता वनडेत सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकरच्या जवळ आला आहे. सचिन तेंडुलकरने 49 वनडे शतके केली आहेत.

विराटने सचिनला टाकले मागे

दरम्यान, विराटने ही शतकी खेळी करताना 13 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या आहेत. तो 13 हजार धावा करणारा जगातील 5 वा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर (18426), कुमार संगकारा (14234), रिकी पाँटिंग (13704) आणि सनथ जयसूर्या (13430) यांनी हा टप्पा पार केला आहे.

दरम्यान, असे असले तरी या चौघांपेक्षाही विराटने सर्वात जलद 13 हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. विराटने 267 व्या वनडे डावात खेळताना हा टप्पा ओलांडला. त्यामुळे त्याने वनडेत सर्वात जलद 13 हजार धावा करण्याचा यापूर्वीचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. सचिनने 321 डावात 13 हजार वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.

महत्त्वाचे म्हणजे विराट वनडेमध्ये सर्वात जलद 8 हजार, 9 हजार, 10 हजार, 11 हजार, 12 हजार आणि 13 हजार धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू आहे.

वनडेत सर्वात जलद 13 हजार धावा करणारे खेळाडू (डावांनुसार)

  • 267 डाव - विराट कोहली

  • 321 डाव - सचिन तेंडुलकर

  • 341 डाव - रिकी पाँटिंग

  • 363 डाव - कुमार संगकारा

  • 416 डाव - सनथ जयसूर्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

SCROLL FOR NEXT