IND vs PAK हाय व्होल्टेज सामन्याचा राखीव दिवशी लागणार निकाल, वाचा नक्की काय झालं

Asia Cup 2023: आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान संघातील सुपर फोरचा उर्वरित सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.
Rohit Sharma | Shubman Gill
Rohit Sharma | Shubman GillDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023 Super Four India vs Pakistan Play to resume on reserve day:

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोरचा सामना खेळवला जात आहे. श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियवर होत असलेल्या या सामन्यात रविवारी पावसाचा व्यत्यय आला, त्यामुळे उर्वरित सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी खेळवला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला होता की भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या होणारा सुपर फोरचा सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यानुसार आता सोमवारी हा सामना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

रविवारी सामना थांबला तेव्हा भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या आहेत. भारताकडून केएल राहुल १७ धावांवर आणि विराट कोहली ८ धावांवर नाबाद आहेत. आता सोमवारी या धावसंख्येपासूनच पुढे सामना सुरू होईल.

सोमवारीही जर पावसाचा व्यत्यय आला, तर डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून सामन्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, जर सोमवारीही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर सामना रद्द ठरवण्यात येईल.

दरम्यान, रविवारी या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीला फलंदाजीला उतरले.

या दोघांनीही भारताला शानदार सुरुवात मिळवून दिली. त्यांनी सलामीला १२१ धावांची भागीदारी रचली. तसेच दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकेही केली. मात्र अर्धशतकानंतर दोघेही लागोपाठच्या षटकांमध्ये बाद झाले.

शादाब खानने 17 व्या षटकात रोहितला फहिम अश्रफच्या हातून झेलबाद केले. रोहितने 49 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली.

रोहित बाद झाल्यानंतर 18 व्या षटकात पुढच्याच षटकात शुभमन गिलला शाहिन आफ्रिदीने आघा सलमानच्या हातून झेलबाद केले. गिलने 10 चौकारांसह 52 चेंडूत 58 धावांची खेळी केली.

रोहित आणि शुभमन बाद झाल्यानंतर विराट आणि केएल राहुलने डाव सांभाळला, पण ते फलंदाजी करताना पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबला. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्याने रविवारी सामना पूर्ण होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com