IND vs PAK: रोहित आफ्रिदीविरुद्ध 'हिट'! पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स ठोकत रचला इतिहास

Rohit Sharma Video: आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाहिन आफ्रिदीच्या पहिल्या षटकात षटकार ठोकत रोहित शर्माने इतिहास रचला आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma hit six to Shaheen Afridi in first over of ODI Cricket innings:

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोरचा सामना खेळवला जात आहे. श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करण्याबरोबर मोठा विक्रमही नोंदवला आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीला फलंदाजीला उतरले.

या दोघांनीही धावफलक हलता ठेवण्याबरोबरोच आक्रमक शॉट्सही खेळले. तसेच अर्धशतकही पूर्ण केले. दरम्यान, रोहितने षटकारासह धावांचे खाते खोलले. याबरोबर विश्वविक्रम केला.

Rohit Sharma
IND vs PAK: रोहित-गिलची शतकी भागदारी ठरली विक्रमी! भारताची ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

रोहितला शाहिन शाह आफ्रिदीने गोलंदाजी केलेल्या पहिल्या षटकातील पहिल्या पाचही चेंडूवर एकही धाव काढला आली नव्हती. पण त्याने अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला आणि त्याचे व भारताचे धावांचे खाते उघडले.

त्यामुळे रोहित वनडे क्रिकेटमध्ये शाहिन आफ्रिदीविरुद्ध डावाच्या पहिल्याच षटकात षटकार ठोकणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आला नव्हता.

या सामन्यापूर्वी आफ्रिदीने वनडेत 41 डावात 26 वेळा पहिले षटक टाकले आहे. पण कधीही त्याने टाकलेल्या पहिल्या षटकात षटकार कोणाला मारता आला नव्हता. मात्र, रोहितने हा पराक्रम करून दाखवला आहे.

कुमार संगकाराच्या जवळ पोहचला रोहित

दरम्यान रोहितने अर्धशतक केल्याने आता तो आशिया चषकात सर्वाधिकवेळा 50 धावांचा टप्पा पार करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत कुमार संगकाराच्या विक्रमाच्या आणखी जवळ पोहचला आहे.

रोहितने आत्तापर्यंत आशिया चषकात 11 वेळा 50 धावांचा आकडा पार केला आहे. या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या कुमार संगकाराने 12 वेळा आशिया चषकात 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Rohit Sharma
पावसाचे सावट असलेल्या IND vs PAK सामन्याला राखीव दिवसाचा दिलासा, पण काय आहेत नियम?

या यादीत संगकारा आणि रोहितच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या आहे. सचिन आणि जयसूर्या या दोघांनीही प्रत्येकी 9 वेळा आशिया चषकात 50 धावांचा टप्पा पार केला आहे.

रोहित सचिन-सेहवागच्या पंक्तीत

रोहित रविवारी सलामीला फलंदाजीला उतरला. त्यामुळे त्याचा हा भारतासाठी सलामीवीर 300 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याचमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून 300 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

सचिनने भारताकडून सलामीवीर म्हणून सर्वाधिक 346 सामने खेळले आहेत, तर सेहवागने 321 सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com