KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: केएल राहुलचं दणदणीत कमबॅक! पाकिस्तानवर हल्ला चढवत ठोकली सहावी 'सेंच्यूरी'

KL Rahul Century: केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकाच्या सामन्यात पुनरागमन करत शतकी खेळी केली आहे.

Pranali Kodre

India vs Pakistan Asia Cup 2023 Super Four KL Rahul 6th Century in ODI Cricket:

आशिया चषकात २०२३ स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना रविवारी सुरू झाला आहे. पण रविवारी पावसामुळे हा सामना पूर्ण न झाल्याने राखीव दिवशी सोमवारी उर्वरित सामना खेळवला जात आहे. राखीव दिवशी केएल राहुलने दणदणीत शतक ठोकले आहे.

दरम्यान केएल राहुलचा हा पुनरागमनाचा सामना आहे. केएल राहुलला आयपीएल २०२३ स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून आता तो पूर्ण सावरला असून भारतीय संघाकडून त्याने शतकासह यशस्वी पुनरागमन केले आहे.

केएल राहुलने या सामन्यात विराट कोहलीसह तिसऱ्या विकेटसाठी दीडशे धावांची भागीदारी रचली आहे. याबरोबरच त्याने 100 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे वनडेतील सहावे शतक ठरले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५ वे शतक ठरले आहे.

केएल राहुलने या शतकासह त्याच्या टीकाकांरानांही चोख प्रत्युत्तर दिले आहे. कारण गेल्या दीड वर्षापासून तो त्याच्या कामिगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करत होता.

केएल राहुलने त्याचे अखेरचे शतक डिसेंबर २०२१ मध्ये केले होते. हे शतक त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे झालेल्या कसोटीत केले होते. तसेच त्याने वनडेत अखेरचे शतक मार्च 2021 मध्ये पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केले होते.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलले अर्धशतके झळकावत चांगली सुरुवात केलेली. रोहितने 56 आणि गिलने 58 धावांची खेळी केली होती. हे दोघे बाद झाल्यानंतर विराट आणि केएल राहुलने भारताचा डाव सांभाळताना धावसंख्या 300 च्या पार नेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach Shacks: गोव्याच्या 'शॅक कायद्या'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान; पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

Goa Dairy: गोवा डेअरीचे व्यवस्थापन 'NDDB'कडेच राहणार? हायकोर्टाचे निर्देश; सर्व निर्णय आणि सामंजस्य कराराचे प्रतिज्ञापत्र सादर करा

Varca Panchayat Construction Permit: हायकोर्टाच्या निर्देशांनाच हरताळ; बांधकाम परवान्यात स्वतःच्या अटी लादल्याने वार्का पंचायत सचिवाला कडक ताकीद

Online Payment: ऐन गणेश चतुर्थीत गॅससाठी 'रोखी'ची सक्ती; Google Pay बंद, ऑनलाइन पेमेंट करता न आल्याने ग्राहकांची मोठी परवड

US Tariff Controversy: 'भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड नाही!', अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफच्या धमक्यांना भारताचं सडेतोड उत्तर; 140 कोटी जनतेचा प्रश्न

SCROLL FOR NEXT