Umran Malik Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 3rd ODI: टीम इंडियात दोन मोठे बदल, उमरानला संधी; पाहा Playing XI

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात इंदोरला तिसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand, 3rd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मंगळवारी वनडे मालितील तिसरा सामना होणार आहे. इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियवर हा सामना होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना तिसऱ्या वनडेसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे, तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना बाहेर करण्यात आले आहे.

तसेच न्यूझीलंडनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. त्यांनी हेन्री शिपली ऐवजी जेकॉब डफी याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

भारताला निर्भेळ यशाची संधी

भारताने तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे ही मालिका आधीच भारताने खिशात घातली आहे. त्यामुळे भारताला आता तिसरा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची संधी आहे.

दरम्यान, न्यूझीलंडही व्हाईटवॉश टाळण्यासाठी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

असे आहेत 11 जणांचे संघ -

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमरान मलिक

न्यूझीलंड संघ - फिन ऍलेन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटेनर, लॉकी फर्ग्यूसन, जेकॉब डफी, ब्लेअर टिकनर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT