Shubman Gill  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: शुभमन गिलने करूनच दाखवलं! आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला रेकॉर्ड नावावर

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत शतकी खेळी करत शुभमन गिलने कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला आजपर्यंत न जमलेल्या विक्रमाला गवसणी घातली.

Pranali Kodre

India vs New Zealand, ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताचा सलामीवीर शुभमन गिल शतकी खेळी केली. याबरोबर त्याने आजपर्यंत कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला न जमलेली कामगिरी करून दाखवली आहे.

शुभमन गिलने या सामन्यात 78 चेंडूत 112 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 5 षटकार मारले. हे गिलचे त्याच्या कारकिर्दीतील चौथे शतक आहे. विशेष म्हणजे त्याने खेळलेल्या शेवटच्या चार सामन्यातील हे त्याचे तिसरे शतक आहे.

गिलने आत्तापर्यंत 21 सामने खेळले असून 21 डावात त्याने फलंदाजीही केली आहे. त्यामुळे तो सर्वात जलद चार वनडे शतके करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने शिखर धवनला या यादीत मागे टाकले आहे. शिखरने त्याच्या पहिल्या 24 वनडे डावात 4 शतके केली होती.

तसेच सर्वात जलद 4 वनडे शतके करणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये गिल चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर इमाम-उल-हक आहे. त्याने 9 डावात 4 वनडे शतके केली होती. तसेच 16 वनडे डावात 4 शतके करणारा क्विंटॉन डी कॉक दुसऱ्या क्रमांकावर आणि 18 डावात 4 वनडे शतके करणारा डेनिस ऍमिस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वात जलद 4 वनडे शतके करणारे फलंदाज

9 डाव - इमाम-उल-हक

16 डाव - क्विंटॉन डी कॉक

18 डाव - डेनिस ऍमिस

21 डाव - शुभमन गिल

22 डाव - शिमरॉन हेटमायर

कोणत्या भारतीयाला न जमलेला कारनामा गिलच्या नावावर

गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या या वनडे मालिकेत 180 च्या सरासरीने 360 धावा केल्या आहेत. त्याने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 208 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने दुसऱ्या सामन्यात नाबाद 40 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात त्याने 112 धावांची खेळी केली.

त्यामुळे गिल तीन सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला करता आला नव्हता.

(Shubman Gill first India batter to score 300 plus runs in a 3-match bilateral series.)

तसेच तीन सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण फलंदाजांमध्ये गिलने बाबर आझमची बरोबरी केली आहे. बाबर आझमने वेस्ट इंडिजविरुद्ध 2016 साली तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 360 धावा केल्या होत्या.

या यादीत बाबर आणि गिल नंतर बांगलादेशचा इमारुल काईस असून त्याने 2018 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 349 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT