Suryakumar Yadav Catch Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: सेम टू सेम! हार्दिकच्या बॉलिंगवर सूर्याने पकडले एकसारखेच दोन कॅच, Video व्हायरल

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 मध्ये हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने एकसारखेच दोन झेल घेतले.

Pranali Kodre

India vs New Zealand, 3rd T20I: भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 168 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी20 मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने एकून तीन झेल घेतले, त्यातील दोन झेल एकसारखेच होते.

या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 235 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्या 4 विकेट्स केवळ 7 धावांवर गमावल्या. यातील 2 विकेट्स कर्णधार हार्दिक पंड्याने घेतल्या होत्या.

विशेष म्हणजे हार्दिकच्या या दोन्ही विकेट्सवेळी सूर्यकुमारने झेल घेतले, तेही एकाच प्रकारे. हार्दिकने पहिल्याच पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिन ऍलेनला आणि तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सला सूर्यकुमारच्या हातून झेलबाद केले.

या दोन्हीवेळी चेंडू फलंदाजांच्या बॅटची बाहेरची कड घेत स्पीपच्या दिशेने गेला होता. त्यावेळी स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या सूर्यकुमारने वर उडी मारत दोन्ही हातांनी झेल घेतले. त्याच्या या एकदम सारख्या वाटणाऱ्या दोन्ही झेलांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सूर्यकुमारने नंतर 9 व्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीवर डीप मिड-विकेटच्या क्षेत्रात झेल घेतला.

या सामन्यात हार्दिकने एकूण 4 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव 12.1 षटकात 66 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने 35 आणि सँटेरनने 13 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 20 षटकात 4 बाद 234 धावा उभारल्या होत्या. भारताकडून शुभमन गिलने 63 चेंडूत 126 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त राहुल त्रिपाठीने 22 चेंडूत 44 धावांची खेळी केली. तसेच हार्दिकने फलंदाजीतही योगदान देताना 17 चेंडूत 30 धावांची खेळी केली.

न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल, ईश सोधी, ब्लेअर टिकनर आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT