India vs New Zealand, 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत खेळलेले खेळाडूच दुसऱ्या वनडेतही भारताकडून खेळताना दिसतील.
तसेच न्यूझीलंडने देखील त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे पहिल्या वनडेत भारताविरुद्ध खेळलेले 11 खेळाडूच दुसऱ्या वनडेतही न्यूझीलंडकडून मैदानात उतरतील.
भारताला विजयी आघाडीची संधी
भारतीय क्रिकेट संघाने हैदराबादला झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला होता. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
त्यामुळे आता भारतीय संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. तसेच न्यूझीलंडही दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाच्या हेतूने मैदानात उतरतील. जर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला, तर इंदोरला होणारा तिसरा वनडे सामना निर्णायक ठरेल.
दुसऱ्या वनडेसाठी असे आहेत प्लेइंग इलेव्हन -
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड संघ - फिन ऍलेन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिएल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटेनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.