India vs New Zealand Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand, 2nd ODI: भारताच्या मालिका विजयाच्या आशा संपुष्टात, दुसरा वनडे रद्द

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

India vs New Zealand, 2nd ODI: न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सेडन पार्क, हॅमिल्टन येथे रविवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना 12.5 षटकांच्या खेळानंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यातील विजयामुळे न्यूझीलंड 1-0 अशा फरकासह आघाडीवर आहे. आता केवळ अखेरचा सामना उरला असल्याने भारताच्या मालिका विजयाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

रविवारी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला मात्र, सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत होता. अखेर भारताने 12.5 षटकांत 1 बाद 89 धावा केल्या असताना पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, भारताकडून शिखर धवन आणि शुबमन गिलने डावाची सुरुवात केली होती. मात्र, कर्णधार धवन अधिक काळ टिकू शकला नाही. तो 3 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सांभाळला होता. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली होती. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

गिलने नाबाद 45 धावा केल्या आणि सूर्यकुमारने नाबाद 34 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने एकमेव शिखर धवनची विकेट घेतली.

या सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम 11 जणांच्या संघात दोन बदल केले होते. शार्दुल ठाकूरच्या ऐवजी दीपक चाहरला आणि संजू सॅमसनच्या जागेवर दीपक हुडाला अंतिम 11 जणांमध्ये संधी देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT